Agriculture Production : देशात यावर्षी 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होण्याची शक्यता!

Agriculture Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष २०२३-२४ साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा (Agriculture Production) तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. ज्यात यावर्षी देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन ३२८८.५२ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे उत्पादन, वर्ष २०२२-२३ मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. दरम्यान, गेल्या ५ वर्षांत (वर्ष … Read more

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’; या जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 5 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा (Weather Update) मिळणार असून, 8 जूनपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. त्यातही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मंगळवारी देखील नाशिक, पुणे, लातूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व (Weather Update) पावसाने … Read more

Goat Farming : असे करा पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन; टळेल आर्थिक नुकसान!

Goat Farming In Rainy Season

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात अनेक शेतकरी हे शेळीपालन (Goat Farming) करतात. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागते. शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही, त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे रोग होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांच्या व्यवस्थापनात (Goat Farming), त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. … Read more

River Linking Project : राज्यात ‘या’ तालुक्यासाठी लवकरच 13 हजार 250 कोटींचा नदीजोड प्रकल्प!

River Linking Project

हॅलो कृषी ऑनलाईन : नदीजोड प्रकल्प (River Linking Project) केंद्रासह राज्य सरकारची अवाढव्य अशी प्रस्तावित योजना आहे. जास्त पाणी असलेल्या नदीखोऱ्यातील पाणी कमी पाणी असलेल्या नदीखोऱ्याकडे वळवणे, हा त्यामागचा उद्देश. हे करण्यासाठी अनेक धरणे, बंधारे अशा प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र आता याच नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचे भाग्य उजळणार आहे. या भागामध्ये … Read more

Fish-Rice Farming : भातशेतीसह करा मासेपालन; आधुनिक तंत्रामुळे कमवाल लाखो रुपये!

Fish-Rice Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात खरीप हंगामात भातशेती (Fish-Rice Farming) मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे केवळ नगदी पीक नसून, ते शेतकर्‍यांच्या चांगल्या उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे पावसाळ्यात भातशेती करण्याकडे कल आहे. भातशेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी खत-खते वापरतात आणि नवनवीन तंत्रे वापरतात. पण भातशेतीबरोबरच मत्स्यशेती (Fish-Rice Farming) करूनही अधिक नफा मिळवता येतो. हे अनेक … Read more

Gokul Milk : म्हशीच्या दूध उत्पादन वाढीसाठी ‘गोकुळ’ला अमेरिकेतून निधी मिळणार!

Gokul Milk Get Fund From US

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) (Gokul Milk) व भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ), उरळी कांचन यांच्या वतीने म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दोन प्रकल्प राबवले जाणार आहे. त्यासाठी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांच्याकडून १ कोटी ४६ लाखाचा फंड मिळणार आहे. अशी माहिती ‘गोकुळ’च्या (Gokul Milk) वतीने देण्यात आली आहे. दोन … Read more

Shevga Lagwad : धान शेतीला फाटा देत, शेवगा लागवड; शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती!

Success Story Shevga Lagwad

हॅलो कृषी ऑनलाईन : मनात जिद्द व चिकाटी असेल, तर शेतीत भरघोस उत्पन्न (Shevga Lagwad) घेता येऊ शकते. शेतीमध्ये उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने आर्थिक आधार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र, मूल येथील युवा शेतकरी सुमित समर्थ यांनी हा दावा खोटा ठरवत अवघ्या पाच महिन्यांत शेवग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक समृद्धी साधली … Read more

Success Story : डाॅक्टरकी सोडली, शेतीत रमले; मिळवतायेत एकरी लाखोंचा नफा!

Success Story Of Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीत फारसा फायदा नसल्याचे कारण सांगून अनेक शेतकरी स्वत:ची शेती दुसऱ्याला (Success Story) भाडे तत्त्वावर देतात. स्वत: एखाद्याकडे कमी पगारावर नोकरी किंवा मजुरी करून जीवन जगतात. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील काेरची येथील डाॅ. नंदकिशाेर अंताराम शेंडे हे याला अपवाद ठरत आहेत. त्यांनी चक्क डाॅक्टरकीचा व्यवसाय साेडून शेती कसण्यास सुरुवात केली आहे. तनमनधनाने … Read more

Milk Price Hike : अमूलपाठोपाठ मदर डेअरीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ!

Milk Price Hike By Mother Dairy

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणूक निकालापूर्वी देशातील दूध दरात (Milk Price Hike) मोठी वाढ झाली आहे. अमूलपाठोपाठ आता मदर डेअरीच्या दुधामध्ये वाढ करण्यात आली आहे. मदर डेअरीने देखील आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किमती ३ जूनपासून लागू झाल्या आहेत. दूध दरामध्ये वाढ (Milk Price Hike) झाल्यामुळे ग्राहकांच्या … Read more

Krishi Seva Kendra : राज्यात 19 कृषी सेवा केंद्रांवर धडक कारवाई, 2 कायमस्वरुपी रद्द, 12 केंद्र निलंबित!

Krishi Seva Kendra

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात सध्या सर्वत्र बियाण्याच्या साठेबाजीला (Krishi Seva Kendra) आणि काळ्या बाजाराला ऊत आला आहे. तर राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या वाढीव दराने कृषी बियाणे विक्रीच्या घटना समोर येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना सध्या बियाणे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अकोला, बुलढाणा, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी … Read more

error: Content is protected !!