Onion Harvesting: अवकाळीच्या संकटामुळे कांदा काढणीला वेग!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिल्याने कांदा काढणीस (Onion Harvesting) वेग आलेला आहे. शेतकर्‍यांना कांद्याची शेती (Onion Farming) करताना मॉन्सूनची अनियमितता, त्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ, कांदा रोपांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर, भरमसाट मजुरी, विजेचा लपंडाव, कांदा निर्यात बंदी या सर्व समस्येला सामोरा जावे लागते. तरीही बळीराजाने चांगल्या दराच्या अपेक्षेने कांद्याची लागवड (Onion Cultivation) … Read more

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही; दरवाढ होण्याची शक्यता!

Onion Export Ban Affects Foreign Countries Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) घोषणा केली. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी पुढे कायम ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे सध्या देशातंर्गत बाजारात कांद्याचा दरावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. एका बाजूला देशांतर्गत बाजारात कांद्याचे … Read more

Onion Cultivation : आता कांदा लागवड करणे झाले सोपे; ‘ही’ मशीन करणार बियाणेचा कांदा लागवड!

Onion Cultivation In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड (Onion Cultivation) केली जाते. राज्यात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी निम्माहून अधिक उत्पादन होते. मात्र, कांदा पीक घेताना शेतकऱ्यांना मजुरांची सर्वात मोठी समस्या असते. अगदी कांदा लागवड (Onion Cultivation) करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. … Read more

Fruit Crops Production : यावर्षी टोमॅटो, कांदा उत्पादनात घट; बटाटा उत्पादन वाढणार!

Fruit Crops Production Increased

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 यावर्षी देशातील फळ पिकांच्या उत्पादनात (Fruit Crops Production) दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी देशात 355.25 दशलक्ष टन इतके फळांचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2021-22 मध्ये 347.18 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. यावर्षी देशात फळ पिकांच्या … Read more

Kanda Bajar Bhav : पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये असूनही, कांदा दरात पुन्हा घसरण!

Kanda Bajar Bhav Today 12 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. ते कांदा दर (Kanda Bajar Bhav) किंवा निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आज आपल्या दौऱ्यावेळी झालेल्या भाषणात ते याबाबत काहीही बोलले नाही. याउलट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी कांदा दरात सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत … Read more

Onion Export : कांदा निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता; दर घसरणीमुळे सरकारचा विचार!

Onion Export Ban Likely To Be Lifted

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यात (Onion Export) बंदीची घोषणा केली होती. देशातील कांदा उत्पादनात घट झाल्याने आणि मागील तीन महिन्यांपासून कांद्याचे दर दुपटीने वाढल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता देशातंर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने, केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात … Read more

Onion Purchase : कांदा उत्पादक शेतकऱ्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; ‘वाचा’ काय म्हटलंय पत्रात!

Onion Purchase Farmer's letter to PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची सरकारी खरेदी (Onion Purchase) सुरु केली आहे. मात्र कांद्याच्या सरकारी खरेदीमध्ये गैरप्रकार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील एका कांदा (Onion Purchase) उत्पादक शेतकऱ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले … Read more

Onion Export : नेपाळला चिनी कांदा आवडेना; भारताकडे कांदा पाठवण्यासाठी विनंती!

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export) निर्णय घेतल्याने शेजारील देशांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या निर्णयामुळे नेपाळसह शेजारील देशांमध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली आहे. नेपाळ हा अन्नधान्यासह कांदा आणि अन्य भाजीपाल्यासाठी पूर्णतः भारतावर अवलंबून आहे. नेपाळ सरकारने भारत सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर चीनमधून कांदा मागवला. मात्र हा कांदा … Read more

Onion Maha Bank : कशी असेल सरकारची कांदा महाबँक; वाचा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नुकतीच राज्यभर कांदा साठवणुकीसाठी कांदा महाबँक (Onion Maha Bank) उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आता कांदा साठवणुकीसाठी ही बँक उभारली जाणार म्हणजे नेमके काय होणार (Onion Maha Bank) आहे. यासाठी राज्य सरकारकडून नेमके काय केले जाणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही … Read more

Onion Purchase : राज्यातून दोन लाख टन कांदा खरेदी करणार! ‘एनसीसीएफ’च्या संचालिकांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Onion Purchase) निम्म्याने घट झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीनंतर कांदा सरासरी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) आणि ‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन … Read more

error: Content is protected !!