Tango Mandarin Variety For Indian Farmers: सह्याद्री फार्म्सने भारतीय शेतकर्‍यांसाठी आणले ‘टँगो मँडरीन’ संत्र्याचे वाण; होणार हे फायदे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: प्रसिद्ध आणि पेटंट असलेली “टँगो” मँडरीन संत्र्याची जात (Tango Mandarin Variety For Indian Farmers) भारतीय शेतकर्‍यांसाठी प्रसारित करण्याची घोषणा सह्याद्री फार्म्सने (Sahyadri Farms) केली आहे. “टँगो” मँडरीन हे अपवादा‍त्मक फळ आता सह्याद्री फार्मशी संबंधित लहान आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊन त्यांच्या कृषी उत्पादकतेत (Agriculture Productivity) सुद्धा वाढ होईल.

काय आहे ‘टँगो मँडरीन’ संत्र्याची वैशिष्ट्ये? (Tango Mandarin Features)

कॅलिफोर्निया विद्यापीठाने विकसित केलेले आणि युरोसेमिलास या अग्रगण्य कृषी नाविन्यपूर्ण कंपनीने जागतिक स्तरावर परवाना प्राप्त केलेला, टँगो मँडरीन’ संत्र्याची खालील वैशिष्ट्ये आहेत.  

  • हा संत्रा त्याच्या अद्वितीय चव, संतुलित ऍसिड-साखर गुणोत्तर आणि रसाळपणा यासाठी जगभर आहे.
  • विशेष म्हणजे हे फळ जवळजवळ बियाविरहित आहे, प्रति 25 फळांमागे फक्त 0.2 बिया आहेत, ज्यामुळे ते ग्राहकांना आकर्षित करते.
  • टँगोच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये बीजरहित, उत्कृष्ट दर्जा, अपवादा‍त्मक आकार, रंग, चव, ब्रिक्स आणि सोलण्याची सुलभता यांचा समावेश होतो.
  • 60 टन/हेक्टर सरासरी उत्पादन म्हणजेच उच्च उत्पादकता आणि ग्राहकांची मागणी यामुळे या फळाची मार्केटिंग चांगली आहे.

सह्याद्री फार्म्स, भारतातील सर्वात मोठी शेतकरी मालकीची फलोत्पादन परिसंस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत 26,000 हून अधिक शेतकर्‍यांना फायदा मिळवून देणार्‍या पेटंट द्राक्ष वाणांना प्रसारित केले आहे. सह्याद्रीने कृषी क्षेत्रात यश आणि नाविन्यपूर्ण उदाहरण प्रस्थापित केले आहे. या यशाच्या जोरावर सह्याद्री फार्म्सने आता लिंबूवर्गीय फळांसाठी नवीन प्रवास सुरू केला आहे. टँगो मंडारीनच्या प्रसारणाने (Tango Mandarin Variety For Indian Farmers) शेतकर्‍यांना (Maharashtra Citrus Farmers) संत्र्याचे उच्च-उत्पादन घेऊन मजबूत बाजार मागणीद्वारे भरीव आर्थिक लाभ मिळवता येईल.

या उपक्रमाचा (Tango Mandarin Variety For Indian Farmers) महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय शेतकर्‍यांवर प्रभाव पडणार आहे. 135,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सुमारे 1,70,000 संत्रावर्गीय शेतकरी वार्षिक 1.8 दशलक्ष टन लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन घेतात. या सदस्य शेतकर्‍यांना (Sahyadri Member Farmer Producer Organizations) फार्मद्वारे टँगो मँडरीन वाण उपलब्ध होतील. या उपक्रमामुळे भारतातील प्रिमियम फळे आणि प्रक्रिया केलेल्या लिंबूवर्गीय उत्पादनांची आयात (Citrus Products Import) कमी होईल आणि स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेला आणखी फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!