Terrace Farming : घराच्या छतावर करा भाजीपाल्याची शेती अन् वाचवा हजारो रुपये; जाणून घ्या कस ते..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Terrace Farming : सध्या पालेभाज्याचे दर गगनाला भिडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोने तर हाहाकार घातला आहे. अनेक सर्वसामान्य लोकांच्या भाजीतून टोमॅटो तर गायबच झाला आहे. टोमॅटो १४० ते २०० रुपये किलो पर्यंत मिळत आहे. त्याचबरोबर कारले, भेंडी, हिरवी मिरची, शिमला मिरची यांचे भाव देखील चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे अनेक जणांनी या पालेभाज्या खाणे सोडले आहे. मात्र घरी पाणी भाजीपाला काढून हजारो रुपये वाचवले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची मेहनत घ्यावी लागेल.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

टेरेस फार्मिंगचे प्रमाण वाढत आहे (Terrace Farming)

भाजीपाल्यांचे वाढते दर पाहता शहरांमध्ये सध्या टेरेस फार्मिंगचे प्रमाण देखील वाढत आहे. यामध्ये टोमॅटो, काकडी, वांगे, हिरवी मिरची इतर भाजीपाला काढता येऊ शकतो त्यामुळे शहरी भागातील लोकांना सुद्धा ताजा आणि हिरवा भाजीपाला खायला मिळत आहे. त्याचबरोबर महागाईच्या दिवसात हजार रुपयांची बचत होऊ शकेल. त्याचबरोबर राज्य सरकार टेरेस फार्मिंगसाठी अनुदान देखील देत आहे त्यामुळे तुम्ही देखील टेरेस फार्मिंग शेती करू शकता/

जाणून घ्या कशी करायची शेती

जर तुम्ही घरी टेरेसवर शेती करणार असाल तर 21 बाय 21 इंच च्या दहा कुंड्या यासाठी तुम्हाला खरेदी कराव्या लागतील त्यांची किंमत 80 ते 100 रुपये आहे. त्याचबरोबर माती, शेण टाकून टोमॅटोची लागवड करू शकता. यानंतर याला काही मध्यंतरी पाणी द्यावे लागेल. मात्र अडीच महिन्यानंतर टोमॅटो उत्पादन सुरू होऊन तुम्ही टोमॅटो खाऊ शकता. तुम्ही घराच्या छतावर टोमॅटो काढून महिन्याचे हजारो रुपये वाचवू शकता.

त्याचबरोबर सध्या शिमला मिरची देखील खूप महाग झाली आहे. शहरी भागातील लोकांना शिमला मिरची सतत लागत असते. पावभाजी बनवण्यासाठी असेल किंवा इतर काही बनवण्यासाठी शहरी भागातील लोक शिमला मिरचीचा जास्त वापर करतात. मात्र तुम्ही याची टेरेसवर शेती करून देखील चांगले उत्पन्न मिळू शकतात. यासाठी तुम्हाला 21 इंच बाय 21 इंची च्या कुंड्या खरेदी कराव्या लागतील त्यामध्ये माती भरून शिमला मिरची लावता येतील.

इथे चेक करा पालेभाज्यांचे भाव

तुम्हाला जर पालेभाज्या खरेदी करण्याआधी त्यांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा हे आम्ही खास तुमच्यासाठी बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजचे बाजारभाव, रोजचा हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा त्याचबरोबर पशूंची खरेदी विक्री इत्यादींची माहिती घरबसल्या घेऊ शकता तेही अगदी मोफत. त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!