Testing Kit for Milk : दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज दुधाचे सेवन केल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दूध प्यावे. मात्र, त्यापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, पनीर इत्यादी देखील शरीरासाठी फायदेशीर ठरतात. मात्र दुधात भेसळीच्या बातम्या वारंवार येत असतात. अशा स्थितीत असे किट तयार करण्यात आले असून, त्याद्वारे दुधात भेसळ सहज शोधता येईल. चलातर मग जाणून घेऊया याबाबत माहिती.
सध्या दुधात सॉर्बिटॉल नावाचे रसायन मिसळल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यामुळे दुधातील घन-चरबीचे प्रमाण वाढून लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नालच्या शास्त्रज्ञांनी असे एक जलद चाचणी किट तयार केले आहे, ज्याद्वारे दुधात सॉर्बिटॉलचे अस्तित्व सहज शोधले जाऊ शकते.
भेसळीचे दूध शोधणे झाले सोपे
रॅपिड टेस्ट किटद्वारे दुधातील सॉर्बिटॉल शोधणे खूप सोपे आहे. चाचणी दरम्यान दुधात आणखी एक रसायन मिसळले जाईल. दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ (Adulterated Milk) आढळून आल्यास चाचणीदरम्यान लगेच रंग बदलला जातो. त्यामुळे भेसळ सहज लक्षात येईल. मात्र, बाजारात या नव्या Testing Kit for Milk किमतीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा करण्यात आला होता. यानिमित्ताने कर्नाल येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दूध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, रॅपिड टेस्ट किटचा खुलासा झाला. त्याच वेळी, त्याची सर्व मुख्य वैशिष्ट्ये देखील लोकांना सांगण्यात आली आहेत.
Hello Krushi अँप बद्दल माहिती आहे का?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमच्या Hello Krushi ॲपबद्दल माहिती आहे का ? जर तुम्हाला अजूनही त्याबद्दल Hello Krushi ॲपबद्दल माहिती नसेल तर दोन मिनिट वेळ काढून ही माहिती नक्की वाचा. आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांसाठी हॅलो कृषी हे ॲप बनवले आहे. या ॲपमध्ये तुम्ही सरकारी योजनांची माहिती, रोजचा हवामान अंदाज, ताजा बाजारभाव, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर हे ॲप लगेचच इन्स्टॉल करा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये माहिती पाहण्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत तुम्ही अगदी मोफत या ठिकाणी माहिती पाहू शकता.