लवकरच येणार आहे PM KISAN चा 11 वा हप्ता ; काही मिनिटात तपासा लाभार्थी यादी,फॉलो करा या सोप्या स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. मात्र ही योजना आर्थिक दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेली योजना आहे. मात्र काही सधन लाभार्थी याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार ऍक्शन मोड वर आले असून अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत. अशात आपल्याला योजनेचा ११ वा हप्ता मिळणार की नाही ? याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे आजच्या लेखात आपण पीएम किसान योजनेची ११ व्या हप्त्यासाठी लाभार्थीं यादी ऑनलाईन कशी तपासायची ? ते पाहणार आहोत.

लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव कसे तपासाल ?

–सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
–आता येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.
–येथे तुम्हाला पुन्हा लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.
–आता येथे तुम्हाला राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गाव इत्यादी माहिती भरायची आहे.
–आता Get Report वर क्लिक करा. येथे तुम्हाला पीएम किसानमध्ये तुमच्या नावाशी संबंधित माहिती दिसेल.

पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यापूर्वी सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवली आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या ई-केवायसीची शेवटची तारीख ३१ मे आहे.

पीएम किसान हेल्पलाइन नंबर

–पीएम किसान हेल्पलाइन नंबर- 155261, 0120-6025109
–पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
–पीएम किसान लँडलाइन नंबर- ०११-२३३८१०९२, ०११-२४३००६०६, ०११-२३३८२४०१
–याशिवाय, तुम्ही [email protected] या ई-मेल आयडीवर मेल करून यासंबंधी कोणतीही माहिती घेऊ शकता

Leave a Comment

error: Content is protected !!