Wheat Harvester : गहू काढणीसाठी ‘हे’ छोटे कृषी यंत्र ठरतंय खूपच फायद्याचं; जाणून घ्या किंमत अन फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्यचा शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत शेतीसाठी मजूर मिळणे खूप कठीण झाले आहे. यामुळे आता यंत्रांचा वापर करणे शेतीसाठी महत्वाचे झाले आहे. ऊस काढण्यापासून ते भट काढणीपर्यंत आता सर्व पिकांसाठी वेगवेगळी यंत्रे विकसित झाली आहेत. आज आपण अशाच एका गहू काढणी (Wheat Harvester) यंत्राबाबत माहिती घेणार आहोत.

भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आता गहू कापणीचा हंगाम सुरू होणार आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधवांसाठी गव्हाचे पीक कापून ते घरी घेऊन जाणे हे एक मोठे काम असते. देशातील वाढत्या महागाईमुळे लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना गहू काढणीसाठी मोठी यंत्रे खरेदी करणे कठीण झाले आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गहू काढणीसाठी स्वस्तात आणि छोटी यंत्रे कोणती याबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत.

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला Ripar प्रमाणे इतर कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

कापणी करण्यासाठी रिपर यंत्र का उपयोगी आहे?

बाजारात अनेक उत्तम आणि नवीन तंत्रज्ञानाची कृषी यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु कापणी यंत्र हे गव्हाचे पीक काढण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. या कृषी यंत्राच्या मदतीने शेतकरी गव्हाचे पीक सहज काढू शकतात. तुमच्या घरातील कमी जागेतही तुम्ही हे मशीन सहज ठेवू शकता. कारण हे यंत्र लहान आहे, जे केवळ लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.

या यंत्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते पिकाच्या 1 ते 2 इंच वर कापणी करते. या मशीनचे एकूण वजन 8 ते 10 किलो पर्यंत असते. जे तुम्ही सहज उठून कुठेही नेऊ शकता. हे कमी इंधन वापरणारे मशीन आहे. या यंत्राद्वारे तुम्ही गहू, मका, धान, धणे, ज्वारी या पिकांचीही काढणी करू शकता. त्यात इतर पिके घेण्यासाठी तुम्हाला फक्त ब्लेड बदलण्याची गरज आहे. जे तुम्ही तुम्हाला हवे तितके बदलू शकता. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत किफायतशीर आहे. भारतीय बाजारपेठेत रीपर कृषी यंत्राची किंमत सुमारे 15 ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!