The Bull Saved Farmers Life: शेतात वीज पडली, बैलांनी बैलगाडी ओढत वाचविले मालक मालकिणीचे प्राण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांचा (The Bull Saved Farmers Life) खरा मित्र जर कोणी असेल तर ते त्याचे पशु (Agriculture Animal). प्रसंगी जीवाची पर्वा न करताही हे जनावर आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्यावर जीव लावतात. व्हॉट्सॲप वर आज अशाच एका घटनेबद्दल वाचण्यात आले. शेतकरी आणि बैल (Farmers And Animal Story) यांच्यातील हा प्रसंग (The Bull Saved Farmers Life) वाचताना तुमचेही डोळे पाणावतील.

बीड जिल्ह्यातील (Beed District) लोणी घाट येथील चौसाळा ते पाटोदा रोड लगत ही सत्य घटना घडली आहे. शेतकरी (Farmer) बीभीषण कदम आणि त्याची पत्नी शेतात काम करत होते.

अचानक वि‍जांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी जिथे बसले होते तिथेच त्याच्या अंगावर वीज कोसळली.

मालकाच्या अंगावर वीज पडली त्या ठिकाणापासून हा बैल दूर होता. मालक मालकीण शांत पडले आहेत हे पाहून बैल सैरभैर झाला हंबरडा फोडत उभा होता. शेवटी तो मुका प्राणी करणार तरी  काय, कोणाला मदतीला बोलावू शकत नव्हता. परंतु कदाचित देवालाच या मुक्या प्राण्याची दया आली. काही वेळ पाऊस झाला आणि पाणी वाहू लागलं आणि मालक आणि मालकीण यांच्या अंगावर पाणी आल्या नंतर ते शुद्धीत आले (The Bull Saved Farmers Life). आग थोडी कमी झाल्याने कसे बसे बिभीषण कदम हे गाडीच्या चाकाला धरून गाडीत चढले आणि बायकोला पण आधार देत गाडीत घेतलं. आपल्या या बैलाला नाव घेऊन हळूच विव्हळत म्हणाले “चलतो का?” हा मालकाचा आवाज ऐकताच या बैलाने पुढच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यावर होऊन चिखलात रोवलेले बैल गाडीचं जू उचलून आपल्या मानेवर घेतलं (The Bull Saved Farmers Life).

याने मानेवर जू घेतलेलं पाहून दुसरा पण बैल आला आणि त्याने ही मान वाकवून जू खांद्यावर घेत आपल्या जोडीदाराला सहकार्य केलं. ना जुंपणं ना मालकाच्या हातात कासरा तरी या बैलाने आपला तीन किलोमीटर प्रवास पार करत घर गाठलं (The Bull Saved Farmers Life).

 घरी आल्यावर मालकाच्या मुलाला पाहून हंबरडा फोडला. आई आणि वडील गाडीत झोपलेले आणि बैलाचा कासरा खाली लोळतोय आणि बैलाचा हंबरडा पाहून मालकाच्या मुलगा धावत गाडी जवळ गेला आणि आई वडीलांची अवस्था पाहून भयभीत झाला.

त्याने लगेच गाडी बोलावून घेतली आई वडील यांना गाडीत घालून बीडचे रुग्णालय गाठले (The Bull Saved Farmers Life).

निर्जन ठिकाणी, ना कोणी शेतात शेजारी माणूस अशा अवस्थेत बैलाने दाखवलेली सतर्कता यामुळे शेतकरी पती पत्नीचा जीव वाचला. बैल जर नसता तर आपलं काही खरं नसत अशा शब्दात  बिभीषण कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करून अश्रुला वाट मोकळी करून दिली. हा बैल  माझा खरा कुटुंबातील माणूस ठरला असे उद्गार त्यांनी काढले (The Bull Saved Farmers Life).

आजच्या जगात मानस माणसाच्या कामी येत नाही यावेळी जनावरांनी दाखवलेले हे निस्वार्थी प्रेम शेतकरी आणि जनावर यांच्या नात्यातील जवळीक दाखवते. शेतकर्‍यांचे खरे मित्र हे त्यांचे पशुधनच आहे हे सिद्ध करते.  

error: Content is protected !!