टोमॅटोच्या दरातील घसरण चिंताजनक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदाच्या हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे टोमॅटो पिकाला मर रोगाने ग्रासले. त्यातही काहीतरी हातात लागेल या आशेने शेतकऱ्यांनी पीक संरक्षणावर मोठा खर्च करून टोमॅटोचे पीक जगवले. मात्र टोमॅटोचे सांध्याचे उतरलेले दर शेतकऱ्यांना आथिर्क नुकसानीला सामोरे जाण्यासाठी भाग पाडत आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विचार करता टोमॅटोला कमाल दर प्रति क्विंटल १२००-१५०० मिळत आहे. सर्वसाधारण दर तर ८०० ते १००० रुपयांच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून काढता येत नाहीये अशी स्थिती सध्या आहे.

चालू वर्षाचा हंगाम उत्पादनाच्या अंगाने अडचणीचा राहिला. हंगामात प्रतिकूल वातावरणात माल तयार करून बाजारात आणला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.सप्टेंबर महिन्यात परराज्यांतील बाजारात मागणी असल्याने आवक वाढून दरही टिकून होते. मात्र नंतर आवक कमी होत असताना दराच्या अंगाने मागणी कमी झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यापूर्वी दरात सुधारणा होती. मात्र पीक संरक्षणावर खर्च वाढल्याने काही अंशी यापूर्वी फायदा झाला, अशी स्थिती आहे.

परराज्यांत स्थानिक मालाची आवक सुरू झाल्याचा परिणाम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यात दिवाळीपूर्व मागणी होती. मात्र, तेथील स्थानिक मालाचे उत्पादन हाती असल्याने नाशिक भागातून मागणी कमी झाल्याने पुरवठा कमी झाल्याचे समजते. त्यामुळे दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील टोमॅटो बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/11/2022
श्रीरामपूर क्विंटल 27 1500 2500 2000
सातारा क्विंटल 64 800 1200 1000
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 25 1015 1500 1325
पुणे लोकल क्विंटल 2053 500 1200 850
पुणे- खडकी लोकल क्विंटल 21 1000 1500 1250
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 25 500 1500 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 411 800 1200 1000
वडगाव पेठ लोकल क्विंटल 230 700 900 800
वाई लोकल क्विंटल 70 700 1500 1100
पारशिवनी लोकल क्विंटल 10 1300 1500 1400
कामठी लोकल क्विंटल 14 800 1200 1000
error: Content is protected !!