हरभऱ्याच्या आवकेत वाढ दर मात्र स्थिर ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याने हरभऱ्याचे मोठी लावण केली. एवढेच नाही तर पारंपारिक पीक ज्वारीला फाटा देत हरभऱ्याची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र सध्याचे खुल्या बाजारातील बाजार भाव बघता हरभऱ्याला हवा तसा भाव मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे हरभऱ्याची आवक जरी वाढली असली तरी दर मात्र जैसे थे आहेत. हरभऱ्याच्या दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक सात हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला हा भाव काबुली चना ला मिळाला असून आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 5600, कमाल भाव सात हजार 100 आणि सर्वसाधारण भाव देखील सात हजार शंभर मिळाला आहे. त्याखालोखाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल पाच हजार 700 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 5900 रुपयांचा भाव मिळाला. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत तेहतिस क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 5500, कमाल भाव 5900 आणि सर्वसाधारण भाव 5700 रुपये इतका मिळाला आहे. मात्र इतर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा विचार करता हा भाव पाच हजार रुपयांच्या आतच आहे. याचबरोबर धरणगाव आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं हायब्रीड चण्याला देखील चांगला भाव मिळाला. हा भाव अनुक्रमे कमाल सहा हजार तीनशे पन्नास आणि सहा हजार रुपये इतका आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा 30-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/03/2022
पुणेक्विंटल33550059005700
राहूरी -वांबोरीक्विंटल8450045004500
पैठणक्विंटल14410044904446
चाळीसगावक्विंटल90350044714350
उदगीरक्विंटल1500465047004675
परळी-वैजनाथक्विंटल160435144714451
राहताक्विंटल24435044944450
वडवणीक्विंटल1390039003900
जळगावचाफाक्विंटल450455052305230
जलगाव – मसावतचाफाक्विंटल23445144514451
धुळेहायब्रीडक्विंटल192431543504350
कल्याणहायब्रीडक्विंटल3520060005600
धरणगावहायब्रीडक्विंटल157440063504575
जळगावकाबुलीक्विंटल90560071007100
शेवगावलालक्विंटल16430045004500
वरोरा-शेगावलालक्विंटल87430044004350
चाकूरलालक्विंटल30450045494535
मुखेडलालक्विंटल55460046004600
मुरुमलालक्विंटल80445048204635
उमरखेडलालक्विंटल190440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल230440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल200400046004300
परभणीलोकलक्विंटल380432544754400
नागपूरलोकलक्विंटल5214410045754458
मुंबईलोकलक्विंटल767520057005500
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल45428145124400
परतूरलोकलक्विंटल61445145204500
देउळगाव राजालोकलक्विंटल15430044464350
गंगापूरलोकलक्विंटल8440046504500
काटोललोकलक्विंटल340400045654350
देवळालोकलक्विंटल1430043054305
गंगाखेडपिवळाक्विंटल4440045004400

Leave a Comment

error: Content is protected !!