‘हा’ पठ्ठ्या 5,500 रुपये लिटर विकतोय गाढवाचे दूध; अमेरिका- युरोप मधून होतेय मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही म्हैस, गाई किंवा शेळी यांच्या दुधाचा व्यवसाय करून अनेकांना चांगले पैसे कमवताना बघितलं असेल. परंतु तामिळनाडू येथील एक पट्ट्या चक्क गाढवाच्या दुधाची विक्री करू चांगलाच मालामाल झाला आहे. बाबू उलगनाथन असे या व्यक्तीचे नाव असून ते तब्बल 5,500 रुपये प्रतिलिटर दुधाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपली शाळा मधेच सोडली होती परंतु आज मात्र त्यांच्या व्यवसायाचा विस्तार पार अमेरिका, युरोप, यूएई पर्यंत पसरला आहे.

गाढवाच्या दुधाला ‘लिक्विड गोल्ड’ म्हणतात. गाढवाचे दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. या दुधामुळे अनेक आजारांवर मात करण्यास मदत होते तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा ते खूप उपयुक्त असते. एकीकडे गाई, म्हैस यांचे दूध जास्त काळ चांगलं राहत नाही, लगेच खराब होते. परंतु दुसरीकडे गाढवाचे दुध हे जास्त वेळ चांगल्यात स्थितीत राहते. हे सुद्धा एक वैशिष्ठय आहे.

कशी केली सुरुवात

बाबू उलगनाथन यांच्या टीमने आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन हॉर्स येथे उद्योजकता विकास कार्यक्रमात भाग घेतला. तिथे त्यांनी गाढवं आणि त्यांच्यापासून केल्या जाणाऱ्या शेतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये भारतातील सर्वात मोठे गाढव फार्म ‘द डॉंकी पॅलेस’ स्थापन केले. यानंतर वन्नारपेठेतील एक समृद्ध उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघीतल जातंय. ते १ लिटर गाढवाचे दूध 5,550 रुपयांना विकत आहेत . गाढवाच्या दुधाशिवाय ते गाढवाच्या दुधाची पावडर, गाढवाच्या दुधाचे तूपही बनवतात. सध्या, बाबू उलगनाथन यांनी 75 पेक्षा जास्त फ्रँचायझी फार्मसह फ्रेंचायझी मॉडेलद्वारे सुमारे 5000 गाढवांचे व्यवस्थापन करणारे भारतातील सर्वात मोठे गाढव फार्मची स्थापना केली आहे. त्यांनी The Donkey Palace One Health – One Solution – नावाचे एक संरक्षण, मनोरंजन आणि जागरूकता केंद्र सुद्धा स्थापित केले आहे, ज्याचा उद्देश गाढवांचे मूल्य आणि समाज आणि अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान वाढवणे आहे हे आहे.

error: Content is protected !!