जुने सातबारा, आठ ‘अ’, मालमत्ता पत्रक, आता घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार ; जाणून घ्या प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जमिनीशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे असणे महत्वाचे असते. त्यातही आठ ‘अ’ चा उतारा आणि सात बारा उतारा हे दाखले अत्यंत महत्वाचे असतात. याबरोबरच त्या जमिनींबाबत इतिहास देखील माहिती असणे आवश्यक असते. ती जमीन पूर्वी कोणाच्या नावावर होती ? बदलत्या वेळेनुसार बदलत्या कायद्यानुसार जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची माहिती शक्यतो आपल्याला मिळत नाही मात्र याची माहिती सरकार दरबारी असते.

तहसीलदार कार्यालय किंवा भूमि अभिलेख कार्यालय सातबारा उतारा, खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते. शेतकरी मित्रांनो एखादा जमिनीचा व्यवहार करायचा असेल आणि तुम्हाला ही माहिती हवी असेल तर आता सहजरीत्या ही माहिती तुम्हाला मिळू शकणार आहे. ही माहिती उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही सुविधा ऑनलाइन देण्यास सुरू केले आहे. महाराष्ट्र सरकारने ई -अभिलेख या या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमधील तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आज आपण घेणार आहोत. या ऑनलाइन नोंदणी मध्ये 1880 पासून चे उतारे तुम्हाला पाहायला मिळतील

–याकरिता सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. ( https://bhulekh.mahabhumi.gov.in/ )

— या वेबसाईटला भेट दिल्यानंतर एक पेज ओपन होईल

— या होम पेज च्या उजव्या बाजू वरील “वीणा स्वाक्षरीत सातबारा, आठ अ , मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी विभाग निवडा” असा पर्याय दिसेल

–या पर्यायावर जाऊन आपल्याला आपला विभाग निवडावा लागेल.

— आपला विभाग निवडल्यानंतर पुन्हा एक वेब पेज ओपन होईल तिथे तुम्हाला कोणत्या प्रकारचा उतारा हवा आहे त्यावर क्लिक करायला लागेल. उदाहरणार्थ ‘सातबारा’, ‘आठ ‘अ’ ‘, ‘मालमत्ता पत्रक’ या तीन पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.

— त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची निवड करा

— त्यानंतर तालुक्याची निवड करा

–त्यानंतर गावाची निवड करा

–तिथे तुमच्या गावाची निवड केल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टींबाबत माहिती हवी आहे त्या पर्यायावर क्लिक करा. उदा ;खाता नंबर , पहिले नाव , मधले नाव , संपूर्ण नाव

— ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्हाला गावातली व्यक्तींची यादी दिसेल .

— यादीतून नाव निवडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल.

–त्यानंतर तुम्हाला लगेच संबंधित उतारा प्राप्त होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!