कधीकाळी अफूसाठी कुप्रसिद्ध होते हे गाव, आता भाजीपाला लागवडीने समृद्ध झाले आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आपण अरुणाचल प्रदेशातील एका गावाविषयी सांगणार आहोत, जे एकेकाळी संपूर्ण राज्यात अफूच्या शेतीसाठी कुप्रसिद्ध होते. सरकारने बंदी घातल्यानंतरही येथील शेतकरी बेकायदेशीरपणे अफूची शेती करत होते. अशा स्थितीत येथे दररोज पोलिसांचे छापे पडत असत. मात्र आता या गावातील लोकांनी अफू सोडून असे पीक घेण्यास सुरुवात केली असून, याची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. त्याचबरोबर आजूबाजूचे शेतकरी शेती शिकण्यासाठी या गावाला भेट देत आहेत. विशेष म्हणजे या शेतीतून येथील लोक लाखोंची कमाई करतात. यासोबतच लोकांची प्रतिष्ठाही वाढली आहे.

अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यात असलेल्या मेडो गावाबद्दल. हे गाव इटानगरपासून 350 किमी अंतरावर आहे. हे गाव एकेकाळी अफूच्या शेतीसाठी कुप्रसिद्ध होते. मात्र येथील लोकांनी आता भोपळ्यासारखी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच आले, मोहरी, चहा या पिकांचीही येथील शेतकरी लागवड करत आहेत. पण या सगळ्यात खास गोष्ट म्हणजे परदेशातून लोक इथे येऊन भाजी खरेदी करत आहेत. यामुळेच आता मेडो गाव फळबाग आणि भाजीपाला लागवडीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले आहे.

या गावात आता अफूऐवजी भोपळ्याची लागवड होत असल्याचे कृषी विकास अधिकारी सांगतात. या गावात वाक्रो नावाचे क्षेत्र असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. वाक्रोमध्ये 500 हून अधिक शेतकऱ्यांनी 1000 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर भोपळ्याची लागवड केली आहे. त्याचबरोबर सुरुवातीला भोपळा तीन रुपये किलोने विकला जात असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र आता विक्रेते स्वत: गावात येऊन सात रुपये किलोने खरेदी करत आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये सरकार दीर्घकाळापासून बेकायदेशीर अफू लागवडीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु 2021 मध्ये येथील शेतकऱ्यांनी सरकारने सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर शेती योजने’चा लाभ घेत अफूऐवजी भोपळ्याची लागवड करण्यास सुरुवात केली. वृत्तानुसार, अफूच्या अवैध लागवडीविरोधात लढण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी सरकारला मदत केली. जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजूनही छुप्या पद्धतीने अफूची बेकायदेशीर शेती करत असले तरी बहुतांश लोकांनी वेगळा मार्ग निवडला आहे.

 

 

 

 

 

error: Content is protected !!