योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

2021-22 च्या गळीत हंगामातील ऊस बिलासाठी 17 ऑगस्ट च्या मोर्चामध्ये ठरल्या प्रमाणे व्यवहार न झाल्यामुळे सोमवार 3 ऑक्टोबर पासुन पाथरी (जि . परभणी ) येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

2021-2022 च्या हंगामातील ऊस बिल थकबाकी व ठेकेदाराचे कमिशन डिपॉझीट व इतर मागण्यासाठी पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर कारखान्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता . त्यावेळी कारखाना प्रशासनाने काही लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांसोबत व्यवहार केलेला नाही म्हणत आता योगेश्वरी शुगर प्रशासनाच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी पाथरी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर
आमरण उपोषणास बसले आहेत.

यावेळी योगेश्वरी शुगर प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्राचे उल्लंघन केल्यामुळे योगेश्वरी प्रशासनावर शेतकर्यांची फसवणुक केल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे. कॉ. दिपक लिपणे कॉ. भागवत कोल्हे कॉ. भागवत शिंदे ,कॉ . गोकुळ शिंदे, काँ . सुभाष नखाते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपोषणाला बसले आहेत .

error: Content is protected !!