Animal Husbandry : पशुपालकांनो सावधान! जनावरांमध्ये कॅल्शिअमच्या कमतरतेची ‘ही’ आहेत लक्षणे; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Husbandry : ज्याप्रमाणे माणसांना कॅल्शियमची गरज असते, त्याचप्रमाणे प्राण्यांना देखील कॅल्शियमची गरज असते. त्यांना वेळोवेळी कॅल्शियम देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या संतुलित आहारात कॅल्शियमचे प्रमाण नियमित असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच जनावरे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात आणि त्यांचे दूध उत्पादन वाढू शकते. आपल्याकडे अनेकजण दुग्धव्यवसाय करतात त्यामुळे तुम्ही जर दुग्धव्यवसाय करत असाल तर प्राण्यांना किती कॅल्शियम द्यावे आणि त्याची लक्षणे काय आहेत. या गोष्टी तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे. चलातरमग जाऊन घेऊया याबद्दल माहिती.

जनावरांची थेट शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

जनावरांना दररोज इतके कॅल्शियम द्यावे –

तुमच्या जनावरांपासून तुम्हाला जर दीर्घकालीन फायदे मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही त्यांना दररोज कॅल्शियम द्यावे. यासाठी तुम्हाला दररोज किमान 50 मिली कॅल्शियम तुमच्या जनावरांना द्यावे लागेल. असे केल्याने प्राण्यांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता कमी होते. परंतु लक्षात ठेवा की ५० मिली कॅल्शियमसोबत ५० ग्रॅम खनिज मिश्रणही जनावरांना द्यावे. (Animal Husbandry)

पशूंची खरेदी विक्री करणे झाले सोपे

शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पशूंची खरेदी विक्री करण्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीबसल्या देखील याची खरेदी विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इंस्टाल करावे लागेल. हे अँप इंस्टाल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पशूचा फोटो टाकून तुम्हचा संपर्क क्रमांक टाकू शकता. यामुळे ज्यांना तुमची गाय किंवा म्हैस घ्यायची आहे. ते शेतकरी तुमच्याशी संपर्क साधतील. त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आणि महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करायचा नाही. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन हे अँप इंस्टाल करा.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे नेमकी कोणती?

 • जनावर सतत कुचमून बसने
 • शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा तापमान कमी.
 • वारंवार थकवा येणे
 • अंगावर तेजी नसणे
 • सतत आजारी पडणे

जनावरांच्या शरीरात कॅल्शियमी कमी असेल तर कोणते तोटे होतात?

 • दूध उत्पादनात घट.
 • स्नायू कमकुवत होणे
 • रक्त प्रवाह मंदावणे.
 • गरोदर राहण्यात अडचण
 • प्राणी वेळेपूर्वी म्हातारा होऊ लागतो.
 • शरीरातील दात आणि हाडे खूप कमकुवत होतात.

कॅल्शियम खाण्याचे फायदे –

 • जनावरांना चाऱ्यासोबत दररोज कॅल्शियम दिले तर जनावर निरोगी राहील.
 • याशिवाय ते इतर प्राण्यांपेक्षा जास्त दूध देईल.
 • कोणतेही काम करताना थकवा जाणवणार नाही.
 • मादी प्राणी सहज गर्भधारणा करण्यास सक्षम असेल.
 • काम करताना प्राणी धडधडणार नाही.
 • कडक उन्हाचा परिणाम जनावरांवर फारसा दिसून येणार नाही.

कॅल्शियम वाढण्यासाठी पशूंच्या आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश –

 • पाहुणचा आहारमध्ये लसूणघास तसेच द्विदलवर्गीय चाऱ्याचा समावेश करावा.
 • पचनव्यवस्था नीट राहण्यासाठी जनावराचा नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी.
 • जनावर विण्याअगोदर १० ते १२ दिवस आधी ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन पशुवैद्यकाच्या मदतीने द्यावे. असे केल्यास कॅल्शियम वाढण्यास मदत होते.
error: Content is protected !!