‘या’ झाडांची पाने विकून कमवा लाखो रुपये; कमी खर्चात लागवड अन औषध फवारणीचं टेन्शन नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतात शेती हा एक प्रमुख उत्पन्नाचा स्रोत मानला जातो. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करते. सध्या मजुरांची कमतरता भासत असलेने आणि खते महाग झाल्याने शेतकऱ्यांचा शेतीमधील खर्च वाढला आहे. परंतु खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. यामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये काही वेगळे प्रयोग करून नफा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही झाडांच्या लागवडीबाबत माहिती देणारा आहोत ज्यांची पाने विकून लाखो रुपयांची कमी केली जाऊ शकते.

शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये जर आपण काही नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित नियोजन केले तरच शेती फायद्यात राहू शकते. शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहणे हि काळाची गरज बनली असून थोडीशी रिस्क घेऊन नवे प्रयोग करण्याची गरज आहे. अलीकडे अनेक शेतकरी वन्य शेतीकडे वळले आहेत. मजुरांची कमतरता अन खतांच्या वाढलेल्या किमती यामुळे मोठ्या क्षेत्रावर शेती करणे कठीण झाले आहे. शेती क्षेत्रातील हटके माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi मोबाईल अँप इंस्टाल करा.

अशी खरेदी करा कमी किंमतीत दर्जेदार बियाणे अन रोपे

शेतकरी मित्रांनो आता दर्जेदार बियाणे अन रोपे कमी किमतीत उपलब्ध होणे शक्य झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपवर शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या सर्व रोपवाटिका मालकांशी सहज संपर्क करण्याची सुविधा आहे. शिवाय या अँपवर थेट विक्रेत्याकडून शेतकऱ्याला सेवा पुरवली जात असल्याने मोठा डिस्काउंट मिळतो आहे. शेतकरी सुद्धा आपले बियाणे या अँपवरून थेट विक्री करत आहेत. यासोबत Hello Krushi अँपवर रोजचा बाजारभावहि चेक करता येतो. सतसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा डाउनलोड करता येतो. आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

तमालपत्र

तमालपत्राला बाजारात मोठी मागणी आहे. तमालपत्राचा वापर मसाला म्हणून केला जातो. डिश चविष्ट बनवण्यासाठी तमालपत्र हमखास सर्वत्र वापरले जाते. याशिवाय तमालपत्राचे सेवन करण्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो. तमालपत्राच्या लागवडीसाठी सरकार अनुदानही देते. एका तमालपत्राच्या झाडाच्या पानांपासून तुम्ही 5,000 रुपये कमवू शकता. त्याच्या 25 ते 30 झाडांसह, आपण वार्षिक 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकता.

केळीचे पान

केळीच्या पानांनाही बाजारात मोठी मागणी आहे. जे लोक केळीची लागवड करतात त्यांच्यासाठी त्याचे पान दुप्पट नफा मिळवण्याचे साधन ठरू शकते. एक, केळीचे फळ बाजारात चांगल्या भावाने विकले जाते. आता त्याच्या पानांपासून खाद्यपदार्थांचे ट्रे आणि प्लेट्स बनवल्या जात आहेत. त्यामुळे कमाईसाठी केळीचे पान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच अनेक हॉटेलमध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढले जाते. तेव्हा तुम्ही जवळच्या हॉटेलमालकांनादेखील याकरता विचारणा करू शकता. शेवटी आपला ग्राहक आपणालाच शोधावा लागतो.

सुपारी

देशातील अनेक भागात सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुपारीच्या क्रेझमुळे हिरवी आणि पिवळी सुपारीचे वेगवेगळे भाव बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय सुपारी तेल बनवणार्‍या प्लांटमध्येही तुम्ही पाने विकू शकता. सुपारी लागवडीवर सरकारकडून बंपर सबसिडीही दिली जाते. अनुदानाचा वापर करून शेतकरी सुपारी लागवडीतून लाखोंची कमाई सहज करू शकतात.

शेवग्याची पान

शेवग्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत आहे. शेवग्याची एकदा लागवड केल्यानंतर चार वर्षे उत्पादन मिळते. शेवग्याची पाने व शेंगा विकून लाखोंचा नफा कमावता येतो. शेवगा ही एक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे शेवग्याची पाने आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून वापरली जातात.

तुळशीची पाने

तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. खोकल्यापासून ते अनेक आजारांवर तुळशीचं एक पण अतिशय गुणकारी समजले जाते. सध्या भारतात अनेक शेतकरी तुळशीची शेती करून चांगला नफा कमवत आहेत. शहरी भागात तुळशीच्या पानांना चांगली मागणी आहे.

error: Content is protected !!