विजांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वरदान ठरणार हे ‘अॅप’ ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , पावसाळा सुरु झाला की वीज चमकून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडतात. त्यातही शेतकरी आणि मेंढपाळ यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. मात्र भारत सरकारने एक मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. त्याद्वारे विजेची पूर्वसूचना मिळणार आहे. या अॅपचे नाव ‘दामिनी अॅप’ असे आहे. हे अॅप वरदान ठरणार आहे.

मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात वीज पडून जीवितहानी होत असते. वीज पडून जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने ‘दामिनी’ अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्वसूचना आपल्या मोबाइलवर देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व विशेषतः शेतकऱ्यांना वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

आता राज्य शासनाने दामिनी अॅप शासनस्तरावर मान्य करुन सर्व अधिकारी, फिल्ड वर्कर्स, शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा असे आवाहान जिल्हा प्रशासनानं केलं आहे. हे अॅप किती प्रभावी ठरेल हे आगामी काळात समजणार आहे. दामिनी अॅपचा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. वीज पडून मृत्यू होण्याची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण गमावतात. दरवर्षी वीज कोसळ्याने शेकडो लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झाले आहेत. बर्‍याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!