शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेड मध्ये 50 ते 60 ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रम झाले आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यात 50 ते 60 ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शासनाकडून अद्याप कोणतीही तत्काळ व ठोस मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळं युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे यावेळी पहायला मिळाले.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या

–बिलोली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी.
–नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, पडझड झालेल्या घराचे पंचनामे करुन तत्काळ मदत देण्यात यावी.
— आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. यासह अन्य मागण्यांसाठी युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत 50 ते 60 ट्रॅक्टरसह भव्य असा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. गेल्या दोन महिन्यापासून बिलोली तालुक्यात सतत अतिवृष्टिचा कहर चालूच आहे. त्यामुळं खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबिन, तूर, कापूस यासह अन्य पिके वाया गेली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी शासनाकडे मोठ्या मदतीच्या अपेक्षेने डोळे लागून बसले होते. पण शासनाने नुकतीच हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत तुटपुंजी आहे. त्यामुळं शेतकरी चिंतातूर आहेत. त्यामुळं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!