पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलया लाल मिरचीला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

नंदूरबार म्हणजे लाल मिरची ची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत केवळ राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील मिरची विक्रीसाठी येत असते. सध्या मिरचीला चांगला दरही मिळतो आहे. मात्र परतीच्या पावसामुळे नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्‍यांवर वाळवण्यासाठी टाकली असता ओली होऊन खराब झाली आहे. हजारो क्विंटल मिरची पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मिरचीला विमा कवच द्या

खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

error: Content is protected !!