हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेती व्यवसायात पारंपरिक शेती व्यवसाय अधिकाधिक पहायला मिळतो. मात्र बदलत्या काळानुसार पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत यांत्रिकीकरणाचा अवलंब शेतकऱ्यांनी केला आहे. यांत्रिकीकरणाची शेती करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे असते. राज्यात एकूण ८० % शेतकरी हे अल्प आणि अत्यल्पभूधारक आहेत. यासाठी आता राज्य सरकारने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मळणी यंत्रासाठी अनुदान देण्याचं ठरवलं आहे.
या योजनेअंतर्गत माहिला शेतकरी, अनुसूचित जाती – जमाती अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत ५० टक्के अनुदान मिळत आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान मिळत आहे. मळणी यंत्राच्या अनुदानात यंत्राच्या ताकदीनुसार बदल होतो. तसेच या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास Hello krushi हे ॲप डाऊनलोड करून या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास असा करा ऑनलाईन अर्ज
शेतकरी मित्रांनो जर आपल्याला राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करा. या ॲपद्वारे आपल्याला आवश्यक असलेल्या योजनेची माहिती एका क्लिकवर मिळू शकते. तसेच ज्या योजनेचा लाभ मिळवायचा आहे. त्या योजनेवर जाऊन तुम्ही घसरबसल्या अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
शेतकऱ्यांसाठी अनुदान
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ४ टन प्रति टना पेक्षा जास्त क्षमता असलेल्या व ३५ बीएचपी (BHP) पेक्षा अधिक मोठ्या असलेल्या मळणी यंत्राला २ लाख ५० हजार रुपये एवढं अनुदान मिळतं. ४ टन प्रती घंट्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या मळणी यंत्राला ८०,००० रुपये एवढं अनुदान दिलं जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे देखील सोबत जोडणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे सोबत जोडल्यास सरकारद्वारे या योजनेचा लाभ मिळवता येईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- जातीचा दाखला
- बँक पासबुक
- यंत्राचे कोटेशन
- तंत्राचा अहवाल
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करावी.