हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळा सुरू झाला की गोठ्यात जनावरांना माशा आणि गोचीड (Tick And Fly Control) यांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. जनावरांमध्ये (Animals) काही महत्वाचे जीवघेणे रोग पसरविण्यास गोचीड कारणीभूत आहेत तसेच ते जनावरांची उत्पादन क्षमता सुद्धा कमी करतात. चावणाऱ्या माशामुळे जनावरात सुर्रा ताप सारखे रोग पसरतात. यामुळे जनावरामध्ये अशक्तपणा येतो. गोचीड आणि चावणाऱ्या माशा जनावरांना प्रचंड अस्वस्थ करतात, जनावरांना एलर्जी सुद्धा होते. या लेखात जाणून घेऊ या गोचीड आणि माशा यांचे नियंत्रण (Tick And Fly Control) करण्याचे सोपे उपाय.
गोचीड नियंत्रण उपाय (Tick And Fly Control)
- नवीन खरेदी केलेल्या कोणत्याही प्राण्याला इतर प्राण्यांमध्ये मिसळण्यापूर्वी त्यांच्या शरीरावरील संपूर्ण गोचीड काढलेले आहेत याची खात्री करावी.
- जनावरांवर वेळोवेळी गोचीड मारणाऱ्या ऍकेरिसाइडचा (Acaricide) वापर करा.
- गोचीड सुमारे 3000 अंडी घालते आणि अळ्या 2-7 महिन्यांपर्यंत आहाराविना जगू शकतात. त्यामुळे गुरांच्या गोठ्यातील सर्व भेगा आणि खड्डे यामध्ये ऍकेरिसाईडची फवारणी करावी.
- थोडी सावधगिरी बाळगून फ्लेम गनद्वारे (Flame Gun For Tick) गोचीड जाळू शकता.
- एकच एक गोचीड नियंत्रक औषधाची फवारणी केल्यास त्यांच्या प्रतिकार क्षमता विकसित होऊ शकते त्यामुळे आलटून पालटून वेगवेगळ्या ऍकेरिसाइडचा वापर करावा.
- योग्य ऍकेरिसाइड आणि त्याच्या डोसबद्दल पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.
चावणाऱ्या माशा नियंत्रण उपाय (Tick And Fly Control)
- खत आणि मूत्र विल्हेवाट यांची नियमितपणे गोठ्यापासून (Animal Shed) योग्य अंतरावर विल्हेवाट लावावी.
- पाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेजची योग्य दुरूस्ती करायला हवी.
- कडूनिंबाची पाने गोठ्यात संध्याकाळी जाळून धूर (Smoking Of Neem Leaves) करावा यामुळे माशांचा उपद्रव कमी करण्यास मदत होईल.
- फ्लाय रिपेलंट्स (Fly Repellants) यांचा वापर करावा.
कडुलिंबाचे तेल हे चावणाऱ्या माश्या आणि गोचीड (Tick And Fly Control) यांच्यासाठी नैसर्गिक रिपेलंट्स म्हणून कार्य करते. हे नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. याचा वापर नेहमी केसांच्या दिशेच्या विरूद्ध केला पाहिजे आणि संपूर्ण शरीर, विशेषतः पोट आणि पाय यावर याचा वापर केला पाहिजे.