हॅलो कृषी ऑनलाईन । फुल म्हंटल कि आपल्याला फील होतो तो म्हणजे फक्त सुगंध… फुलांच्या सुगंध घेण्यासारखा दुसरा मनमोहक आनंद नाही. परंतु एखादे दुर्गंधीसारखा वास येणार फुल तुम्ही कधी पाहिलं आहे का ? तुम्ही कदाचित अशा फुलाचा सुगंध घेणं तर दूरच परंतु असे फुल कधी बघणार सुद्धा नाही. परंतु ऑस्ट्रेलियातील अॅडलेड बोटॅनिक गार्डन्स एक फुल असं आहे ज्याचा वास कुजलेल्या मांसासारखा येतो मात्र तरी सुद्धा हजारो पर्यटक त्याला आकर्षित झाले आहेत.
टायटन अरुम (Titan Arum) असं या दुर्मिळ फुलाचे नाव असून या फुलाची झलक पाहण्यासाठी हजारो लोक बागेत येत आहेत. ऑस्ट्रेलिया मधील द गार्डियननच्या वृत्तानुसार हे फुल २ वर्षातून एकदा आणि ते सुद्धा फक्त ४८ तास फुलते. या फुलाला येणाऱ्या वासाची तुलना सडलेल्या मांसाच्या वासासोबत होऊ शकते. परंतु परागणासाठी कीटकांना आकर्षित करण्यासाठी हा वास एकप्रकारे फुलांना मदतच करतो.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही तुमच्या शेतात फुलं किंवा रोपे लावायची असतील तर काळजी करू नका. हॅलो कृषी हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या आसपासच्या परिसरातील रोपवाटिका मालकांशी थेट संपर्क साधा. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi Download करून Install करा. अँप ओपन करताच तुम्हाला रोपवाटिका, खत दुकाने आणि कृषी केंद्र हा पर्याय दिसेल. यावर क्लीक करताच तुम्हाला तुमच्या आसपास असलेल्या रोपवाटिकांची आणि खत दुकानदार यांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिसतील. एवढंच नव्हे तर हॅलो कृषीवर तुम्हाला सर्व मालाचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा यांसारख्या सुविधा मिळतील त्या सुद्धा अगदी मोफत…. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकता.
Click Here To Download Hello Krushi App
टायटन अरम फुलाची दुर्गंधी प्रामुख्याने पहिल्या सहामाहीत येथे. सध्या हे फूल बहार येण्याच्या निम्म्यावर आले आहे. परंतु 48 तास पूर्ण झाल्यानंतर ते लगेच गळून जातं . टायटन अरम हे फुल हे मूळ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील आहे. देशाने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाला तीन बिया भेट दिल्या होत्या त्याच्या मदतीने त्याची ६ रोपे वाढवण्यात आली.
त्यानंतर, 2013 मध्ये, ऑस्ट्रेलियन तज्ञांनी एक प्रसार चाचणी सुरू केली, ज्यामध्ये स्थापित वनस्पतींच्या पानांच्या कटिंगचा वापर अधिक विविधता वाढवण्यासाठी केला गेला. हे टेस्टिंग यशस्वी झाल्यांनतर ऑस्ट्रेलियामध्ये 100 टायटन अरम वनस्पतींचा प्रसार अनेक लीफ-कटिंग तंत्रांचा वापर करून करण्यात आला. टायटन अरमची झाडे 2-मीटर-उंची वाढू शकतात.