उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड ही उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहे. मात्र यंदा काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याने याचा फायदा हा केळीवर होताना दिसत आहे. दरम्यान, उन्हापासून केळीची बचत व्हावी. यासाठी नंदुरबार येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने केळीच्या रोपांच्या भोवती तागाची लागवड केली.

आपल्या शेतात केळी लागवड करण्यापूर्वी दहा दिवसांपूर्वी जगदीश पाटील यांनी तागाची लागवड केली. यामुळे रोपांचे नुकसानाचे प्रमाण कमी होताना दिसते. या रोपाला आणि लागवडीला आतापर्यंत १ लाख रुपये एवढा खर्च आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, सेंद्रिय खत कायम ठेवण्यासाठी तागाचे पीक कायम ठेवणे गरजेचे आहे. कमी कालावधीत जलद वाढणारे आणि भरपूर पाला देणारे पीक आहे.

उन्हापासून केळीचा बचाव व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे संशोधन

तागाच्या पिकापासून हेक्टरी ३० टनाहून अधिक बायोमास मिळत असून विशेष तंत्र वापरायची आवश्यकता नाही. जमिनीतील अन्नद्रव्य, हयुमस, फल्वीक अ‍ॅसीड, सेंद्रिय कर्ब आणि नत्र वाढविण्यासाठी तागाचा फायदा होतो. दीड महिन्याच्या कालावधीत नत्रयुक्त अन्नद्रव्य उपलब्ध असतात. याचा उपयोग हा केळीच्या वाढीच्या काळात होतो. अधिकाधिक अन्नद्रव्य हे तागानंतरच्या पिकाला उपलब्ध होते.

तागाच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असल्याने तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने ते कुजण्याची शक्यता अधिक असते. पिकांची मुळे खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेतली जात असून मुळे ही खालील थरात मिसळली जात आहेत. उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी केलेला ताग लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात होत असून शेतकऱ्याचे संशोधन पुढं आले आहे.

error: Content is protected !!