Tomatoes Price Increases: टोमॅटोची लाली खुलली ; दर झाले दुप्पट , पहा किती आहे भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील वर्षी टोमॅटोला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकायची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोला बाजारात चांगला दर मिळतो आहे. या आठ दिवसातच टोमॅटोच्या दरामध्ये उसळी आली आहे. शिवाय टोमॅटो हा रोजच्या स्वयंपाकात रोज वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे त्याला नेहमीच मागणी असते. सध्या टोमॅटोच्या (Tomatoes Price Increases) वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली असली तरी शेतकऱ्यांना मात्र चांगला भाव मिळतो आहे.

टोमॅटोच्या आवकेत घट

मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्णतेमुळे झाडांना सुकवा येऊन फुलगळ होण्यासह फळधारणा अवस्थेत अडचणी आल्याने उत्पादनात घट आली आहे. शिवाय मर, सूत्रकृमी या रोगांसह फळमाशी, टुटा व लालकोळीचा प्रादुर्भाव झाल्याने एकूण लागवडीपैकी ७० टक्के क्षेत्रावर उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यातील नारायणगाव, संगमनेरसह जिल्ह्यातील अभोणा (ता. कळवण) दोडी, पांढुर्ली, दापूर(ता. सिन्नर) व इगतपुरी तालुक्यातील दौंडत, कचरगाव, तळोशी, धामणी, मुरमी, वैतरणा या भागांत लागवडीवर परिणाम होऊन उत्पादन घटल्याने आवकेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. तर सटाणा तालुक्यातील लागवडी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २०) उच्चांकी ६ हजार ३७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर ४ हजार २५० रुपये (Tomatoes Price Increases) राहिला. गेल्या आठवड्यात आवक स्थिर होती, मात्र १७ मेनंतर आवक कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आठ दिवसांत टोमॅटोच्या दरात तेजी येऊन ते दुप्पट झाले आहेत. शिवाय कीड, रोग व तापमानवाढ यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. गेल्या दीड महिन्यापासून दरात कायम सुधारणा दिसून आली. उन्हाळ्यात दर तिसऱ्या दिवशी एकरी प्रतितोड्याला सरासरी १२०० क्रेट टोमॅटो (Tomatoes Price Increases) निघतात; मात्र साध्य ते निम्म्यावर आले असून, ५०० ते ६०० क्रेट उत्पादन मिळत आहे. दरात सुधारणा दिसून येत असली तरी अनेक उत्पादनावर परिणाम झाल्याने काहीशी नाराजी आहे. एकंदरीतच टोमॅटो दराचे गणित निसर्गावर अवलंबून आहे.

कोल्हापुरात सर्वाधिक 10,000 रुपये क्विंटल दर

शेतकरी मित्रानो मागील दोन दिवसांचे कोल्हापूर येथील टोमॅटो (Tomatoes Price Increases) दर पहिले असता हे दर राज्यातीळ सर्वधिक दर असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरात सर्वधिक 10000 रुपये क्विंटल भाव कोल्हापुरात मिळतो आहे. तर किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर ३० रुपये पाव झाला आहे. आता लिंबू नंतर रोजच्या वापरातील टोमॅटोही महाग झाला आहे.

टोमॅटोचे राज्यातील ताजे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2022
श्रीरामपूरक्विंटल25400050004550
साताराक्विंटल34400080006000
राहताक्विंटल6120043002700
पुणे- खडकीलोकलक्विंटल6180020001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7250055004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल238200045003250
वाईलोकलक्विंटल70300065004500
रत्नागिरीनं. १क्विंटल250500065005500
22/05/2022
कोल्हापूरक्विंटल1953000100006500
श्रीरामपूरक्विंटल23100025001700
साताराक्विंटल68400060005000
मंगळवेढाक्विंटल2850060003800
राहताक्विंटल3200045003200
नाशिकहायब्रीडक्विंटल571040055004000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल25323035003370
रामटेकहायब्रीडक्विंटल38400050004500
पुणेलोकलक्विंटल1842200060004000
पुणे- खडकीलोकलक्विंटल3180020001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4250035003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल297200045003250
जुन्नर – नारायणगावलोकलक्विंटल1270300050004000
फलटणवैशालीक्विंटल21100060003600
21/05/2022
कोल्हापूरक्विंटल1433000100006500
औरंगाबादक्विंटल46160037002650
पाटनक्विंटल6400055004750
खेड-चाकणक्विंटल86450055005000
श्रीरामपूरक्विंटल25200025002250
मंगळवेढाक्विंटल33150059004500
नाशिकहायब्रीडक्विंटल434340062554000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल22205030002670
रामटेकहायब्रीडक्विंटल24280034003100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60300050004000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6300050004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल222400050004500
जुन्नर – नारायणगावलोकलक्विंटल1220250050003500
नागपूरलोकलक्विंटल1100400050004700
चांदवडलोकलक्विंटल11100035002500
वाईलोकलक्विंटल60300060005300
पारशिवनीलोकलक्विंटल3300050004000
कामठीलोकलक्विंटल15300050004500
पनवेलनं. १क्विंटल530480050004900
जळगाववैशालीक्विंटल25200040003000
नागपूरवैशालीक्विंटल600450055005250
कराडवैशालीक्विंटल36500060006000
फलटणवैशालीक्विंटल12100060004000

Leave a Comment

error: Content is protected !!