हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसात टोमॅटोच्या (Tomato Sell) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे NCCF ने हा वाढलेला दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप सुरु केलेला आहे (Tomato Sell).
नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) ने मुंबईतील किरकोळ बाजारात (Mumbai Market) टोमॅटोच्या वाढत्या किमती (Tomato Rate) स्थिर ठेवण्यासाठी हालचाल सुरु केलेली आहे. NCCF ही केंद्र सरकारची एजन्सी घाऊक मंडईतून टोमॅटो खरेदी करत आहे आणि वाजवी किरकोळ किमतीत (Retail Price) विकत आहे (Tomato Sell).
किरकोळ स्तरावर नफा मार्जिन वाजवी राहील याची खात्री करणे, मध्यस्थांना होणारा फायदा रोखणे आणि त्याद्वारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे यामागचे कारण आहे.
सुरवातीला, टोमॅटोची विक्री (Tomato Sell) 60 रुपये प्रति किलोग्रॅम याप्रमाणे सुरू होईल: NCCF कार्यालय, चिंचपोकळी/लोअर परळ, सायन सर्कल, वरळी नाका, अशोकवन, बोरिवली पूर्व याठिकाणी सुरु होणार आहेत.
केंद्रीय एजन्सीच्या मुंबई- नाशिक NCCF शाखेने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ते किंमतीतील वाढ थांबवण्याचा आणि बाजारातील किंमत स्थिरता राखण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे ग्राहकांना फायदा होऊन वाजवी व्यापार पद्धतींना प्रोत्साहन मिळते, आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण सुद्धा होते.
येत्या काही दिवसांत, ग्राहकांच्या सोयीसाठी किरकोळ ठिकाणांची संख्या वाढू शकते असेही NCCF ने म्हटले आहे. अहवालानुसार, किरकोळ बाजारात टोमॅटोचा (Retail Tomato market) भाव 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला होता, तो अलीकडेच नरमला आहे.
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की सरकारकडे अन्नधान्याच्या वाढत्या किमती स्थिर करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी (PSF) यंत्रणा आहे. जेव्हा जेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतात अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा PSF चा वापर करून वस्तू खरेदी केली जाते. या जीवनावश्यक वस्तू थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात, ज्यामुळे मध्यस्थ खर्च कमी होतो आणि ग्राहकांना उपलब्धता सुनिश्चित होते. या उपक्रमामुळे टोमॅटोच्या किमती कमी होतील, बाजारपेठ स्थिर होईल आणि ग्राहकांना अनुदानित दराने टोमॅटो (Tomato At Subsidized Rate) उपलब्ध होतील.