Tomato Storage Tips : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून पुढच्या काळामध्ये टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर मोठी चिंता उभी राहिली आहे. टोमॅटो ही अशी गोष्ट आहे जी दीर्घकाळ टिकत नाही मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता.
बरेच जण टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे साठी फ्रीजचा वापर करतात. मात्र अनेकांच्या घरी अजूनही फ्रिज नाहीत त्यामुळे फ्रिज शिवाय टोमॅटो कसे टिकवून ठेवायचे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत (Tomato Storage Tips)
प्लास्टिक कंटेनर वापरा
बऱ्याचदा आपण टोमॅटो हे स्वयंपाक घरात ठेवतो मात्र स्वयंपाक घरात उष्णता जास्त असल्यामुळे टोमॅटो लवकर खराब होतात. मात्र आता तुम्ही टोमॅटो स्टोर करण्यासाठी प्लास्टिक कंटेनर वापरू शकता. ज्यामध्ये हवा खेळती राहील अशा प्लास्टिकच्या डब्यात भरून घरातील थंड ठिकाणी ठेवा. या पद्धतीचा जर तुम्ही योग्य वापर केला तर तुमचे टोमॅटो दीर्घकाळ टिकू शकतात.
त्याचबरोबर टोमॅटो स्टोअर करण्यासाठी मातीचा देखील तुम्ही वापर करू शकता. तुम्ही टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याला कोरडे करून मातीमध्ये ठेवू शकता असे केल्याने टोमॅटो दीर्घकाळ टिकवून राहू शकतात. त्याचबरोबर तुम्ही ओपन बॉक्समध्ये टोमॅटो देखील ठेवू शकता. वरील सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला टोमॅटो किंवा इतर भाजीपाल्यांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आजच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi चे ॲप डाऊनलोड करा यामध्ये तुम्ही रोजचा बाजारभाव चेक करू शकता त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोर वरून जाऊन आपले हे ॲप इन्स्टॉल करा.