हॅलो कृषी ऑनलाईन: भारत हा टोमॅटोचा (Tomato Waste Utilization) जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे पण अतिरिक्त उत्पादनामुळे बहुतेक उत्पादन यामुळे बहुतेक माल वाया जातो, व कचऱ्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. मूल्य साखळीच्या विविध टप्प्यांवर दरवर्षी सुमारे 30-35% टोमॅटो (Tomato Wastage) नष्ट होतात. किमतीतील अस्थिरता ही आणखी एक मोठी समस्या आहे, कारण पुरवठ्यातील व्यत्यय आणि हवामानाच्या बदलामुळे किमती वाढू शकतात. मोठ्या उत्पादनामुळे टोमॅटोच्या किमती साधारणपणे डिसेंबर ते मार्च दरम्यान घसरतात, परंतु उत्पादन कमी असताना जुलै ते नोव्हेंबर या काळात ते झपाट्याने वाढतात. यामुळे शेतकऱ्यांचे लक्षणीय नुकसान होते.
भारतातील टोमॅटो (Tomato Waste Utilization) पुरवठा साखळी स्थिर करण्यासाठी, ग्राहकांना वर्षभर परवडणारी क्षमता आणि शेतकऱ्यांना चांगल्या किंमती मिळाव्यात यासाठी ग्राहक व्यवहार विभागातर्फे 30 जून 2023 रोजी टोमॅटो ग्रँड चॅलेंज (TGC) लाँच करण्यात आले होते.
टोमॅटोच्या कचऱ्याचा वापर (Tomato Waste Utilization) करून कीटकनाशके, कोटिंग मटेरियल आणि अगदी ‘वाइन’ तयार करण्याचे मार्ग शोधून काढणाऱ्या नवोदित उद्योजकांना यासाठी आवाहन करण्यात आले होते. यासाठी मिळालेल्या 1,376 सबमिशनमधून 28 नवोदितांची यादी विभागाने अंतिम केली आहे.
टोमॅटोपासून तयार होऊ शकतात हे उपपदार्थ आणि वस्तू!
टोमॅटोपासून (Tomato Waste Utilization) जे उपपदार्थ तयार करता येतात त्यामध्ये वाइन ही एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि इतर उपायांसह, शेल्फ लाइफ सुधारून आणि कचरा कमी करून टोमॅटो मूल्य साखळीत बदल घडवून आणता येते. त्यामुळे आता किमती कोसळल्यावर शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन फेकून द्यावे लागणार नाही.”
टोमॅटोच्या कचऱ्यापासून (Tomato Waste Utilization) बनविलेले जैव-कीटकनाशके, कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञानातील प्रगती, उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी सुधारित पॅकेजिंग पद्धती आणि प्रक्रिया केलेल्या टोमॅटो उत्पादनांची निर्मिती यांचा समावेश आहे.
हे उपाय केवळ टोमॅटो शेतीतील आर्थिक आव्हानांना सामोरे जात नाहीत तर कीटकनाशकांचे अवशेष कमी करणे, स्वच्छ, सुरक्षित उत्पादनात योगदान देणे हे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे हे सर्व प्रकल्प कमी किमतीचे आहेत, आणि प्रकल्पाच्या गरजेनुसार नवीन उद्योजकांना ₹2 ते ₹5 लाखांपर्यंत निधी देण्यात आला आहे.
TGC प्रयोग यशस्वी झाल्यास इतर कृषी क्षेत्रातील अशाच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे मॉडेल म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.