हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही जर शेतात लिंबाची (Lemon Variety) लागवड करायचा विचार करत असाल तर आजचा लेख आहे खास तुमच्यासाठी, कारण आम्ही सांगणार आहोत तुम्हाला लिंबाच्या ‘टॉप तीन जाती’ (Lemon Variety).
लिंबामध्ये दोन प्रकार आहेत एक लाईम (Lime) म्हणजेच पातळ सालीचे लिंबू आणि दुसरा प्रकार लेमन (Lemon) म्हणजेच जाड सालीचे लिंबू. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कागदी लिंबाच्या फळांना जास्त मागणी असल्यामुळे त्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. लेमनची फळे लोणच्यासाठी चांगली असतात.
कागदी लिंबामध्ये स्थानिक जातीपासून लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात अधिक उत्पादन देणार्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती (Lemon Variety) आता प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. त्यांची निवड करणे शेतकऱ्यांना जास्त फायद्याचे ठरते. त्यापैकी काही जाती जसे प्रमालीनी, विक्रम, साई शरबती, त्यांचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.
लिंबाच्या जाती (Lemon Variety)
प्रमालिनी (Pramalini Lime)
• स्थानिक जातीपेक्षा 35 ते 39 टक्के जास्त उत्पादन देणारी
• फळधारणा घोसात (गुच्छात 3 ते 7 फळे)
• फळधारणा जून-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होते.
• रसाचे प्रमाण 57 टक्के.
विक्रम (Vikram Acid Lime)
• स्थनिक जातीपेक्षा 30 ते 32 टक्के उत्पादन जास्त
• फळे 5 ते 10 गुच्छात येतात
• फळ साधारण जून-जुलै, नोव्हेंबर-डिसेंबर व नेहमीच्या हंगामा व्यतिरिक्त होते व उन्हाळ्यात फळे मिळतात
साई शरबती (Sai Sharbati Lemon)
• पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने जात विकसीत केली आहे
• फळे नियमित आकाराची जास्त विद्राव्य पदार्थ व आम्लता असलेली व अधिक उत्पादन देणारी जात
• उन्हाळ्यात 25 टक्के जास्त उत्पादन देणारी
• रसाचे प्रमाण 55 टक्के
• खैर्या रोगास प्रतिकारक (Citrus Canker Resistant Variety)