Tractor Without Driver: विना ड्रायव्हर ट्रॅक्टर करतंय शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी! देशातील पहिल्याच या प्रयोगाचे तंत्रज्ञान आहे तरी काय?

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतीत यांत्रिकीकरणाचा (Tractor Without Driver) मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मजूरांची कमतरता यामुळे शेतात ट्रॅक्टरचा वापर वाढलेला आहे. परंतु आता आम्ही जर तुम्हाला सांगीतलं की आता ट्रॅक्टर चालवायला सुद्धा माणसाची गरज नाही (Tractor Without Driver), तर तुम्हाला आश्चर्य तर नक्कीच वाटेल.

अकोल्यात (Akola) जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे (Tractor Without Driver) पेरणी केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा (German Technology) महाराष्ट्रातला (Maharashtra) हा  पहिलाच प्रयोग असल्याचा दावा या शेतकाऱ्याने केला आहे.

अकोल्यातील राजू वरोकार (Raju Warokar) आणि त्यांच्या कुटुंबियांनी ‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या (GPS Connect Software) माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे (Tractor Without Driver) सोयाबीन आणि तुरीची पेरणी (Soybean And Tur Sowing) केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातला हा  पहिल्यांदाच केलेला वापर असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलाय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकर्‍यांसाठी हे तंत्रज्ञान (Agriculture New Technology) सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले. जाणून घेऊ या कसे आहे हे विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी मशीन (Auto Pilot Sowing Technology Machine). 

कशी होते विना ड्रायव्हर शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी?

या तंत्रज्ञानात शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही (Tractor Without Driver). शिवाय पेरणीही अगदी सरळ होते. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे आर्टीके उपकरण लावण्यात आले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागतेय. तर जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जात असतं. अशी माहिती अभियंता आणि अभ्यासक आशिष हांडे यांनी दिली. आर्टीके हे उपकरण ट्रॅक्टरमधील उपकरणासोबत जोडले जाते. हे उपकरण जर्मन बनावटीचे आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना  4. 5 ते 5 लाख रूपये इतका खर्च येतो. पुढील काळात या प्रयोगा द्वारे अधिकाधिक शेतकरी अशी यांत्रिक पेरणी करण्यासाठी कृषी विभाग (Agriculture Department) आता पुढाकार घेणार असल्याची महिती अकोला येथील आत्मा या कृषी विभागाचे प्रकल्प संचालक मुरली इंगळे यांनी दिली.

राज्यातला पहिलाच प्रयोग (First Experiment In Maharashtra)

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानातील प्रगतीनंतरही ट्रॅक्टर चालवायला (Tractor Without Driver) चालक हा लागत होता. मात्र, आता तंत्रज्ञान याही टप्प्याच्या पुढे गेले आहे. आता विनाचालक ट्रॅक्टरच शेतात काम करू लागले आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात स्टेअरींगचे आपोआप फिरणे हे कदाचित कोणती जादू वाटेल. मात्र, हे शक्य झालंय ते ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजीमुळे. अकोल्यातील वरोकार या शेतकरी कुटुंबाने आपल्या शेतात हा प्रयोग केलाय. विजयेंद्र आणि राजू वरोकार असे हे तंत्रज्ञान वापरणार्‍या अकोला येथील शेतकर्‍यांचे नाव आहे. 

भारतीय शेतीने आता मळलेल्या वाटा सोडत नव तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यात नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतीला नवे स्वरूप प्राप्त होऊ शकते. अकोल्यातील जीपीएसचा वापर करीत पुढे ऑटो पायलट सोईंग तंत्रज्ञान (Tractor Without Driver) याच बदलांची नांदी म्हणता येईल.