Turmeric Farming : हळदीच्या नवीन वाणाचा शोध; तरुण शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Turmeric Farming) : रत्नागिरी जिल्ह्यातील गूहागर तालुक्यातील अबोलीला येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कारेकर या तरुण शेतकऱ्याने नवीन हळदीच्या वाणाचे (कोकण -४) संशोधन केले आहे. त्यांच्या या शोधाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते कारेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नॅशनल ग्रासरूट इनोव्हेशन अवॉर्ड २०२३ कारेकर यांना प्रदान करण्यात आला. हळदीच्या वाणाचे त्यांनी संशोधन केले. कृषी क्षेत्रातील उद्योगाबाबत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून सदिच्छा दिल्या आहेत. या हळदीला कीड व रोगास बळी न पडणारी (कोकण -४) ही हळदीची जात विकसित केली.

नॅशनल इन्नोव्हेशन फाऊंडेशनचे गुजरातमधील वरिष्ठ प्रकल्प सहकारी विपीन रातुरी यांनी कारेकर यांच्या क्षेत्राला जाऊन भेट दिली. कारेकर यांचे काम पाहून शिफारस करण्यात आली होती. या हळदीची जात अधिकाधिक कोकणात प्रसिद्धीस आहे. Turmeric Farming

सचिन कारेकर हे दरवर्षी हळद लागवड करण्याचे काम करत असतात. हीच लागवड कशी करायची याबाबत माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. केंद्रात त्यांनी प्रशिक्षण सत्र देखील सुरू केलं. २० वर्षांचा दांडगा अनुभव उराशी बाळगून हळदीच्या लागवडीपासून ते काढणीचे मार्गदर्शन कारेकर शेतकऱ्यांना करतात.

error: Content is protected !!