हॅलो कृषी ऑनलाईन: महिलांना (Udyogini Scheme) स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येतात. त्यापैकी एक उद्योगिनी योजना (Udyogini Scheme) आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या (Women Empowerment) सक्षम होता यावे, यासाठी शासनाच्या वतीने उद्योगिनी योजना (Udyogini Scheme) ही एक अत्यंत महत्वाकांक्षी मानली जात आहे.
उद्योगिनी योजनेची वैशिष्ट्ये (Udyogini Scheme Details)
- उद्योगिनी योजनेंतर्गत अत्यंत गरीब, निराधार, विधवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना प्राधान्य देऊन योजनेतंर्गत बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.
- इतर महिलांना मात्र यासाठी अत्यल्प व्याज द्यावे लागणार आहे.
- महिलांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
- 18 ते 55 वयोगटातील महिला उद्योजक (Women Entrepreneurs), शेती, किरकोळ आणि अशा प्रकारच्या लघुउद्योगामध्ये कर्जाची सोय केली गेलेली आहे.
- या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, लाभार्थीला कर्जामध्ये 30 टक्के अनुदान देण्यात येते.
- या योजनेच्या (Udyogini Scheme) माध्यमातून महिलांना स्व कर्तृत्वावर खासगी व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे.
पात्रता
- अर्जदार एक महिला असावी.
- अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न सर्वसाधारण आणि विशेष श्रेणीतील महिलांसाठी ₹ 1,50,000/- पेक्षा कमी असावे.
- विधवा किंवा अपंग महिलांसाठी कौटुंबिक उत्पन्नावर मर्यादा नाही.
- अर्जदाराचे वय सर्व श्रेणींसाठी 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराने मागील कोणत्याही आर्थिक कर्जावर डिफॉल्ट केलेले नसावे.
आवश्यक कागदपत्रे
खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- योजनेच्या पात्र लाभार्थीना पासपोर्ट आकाराचे फोटो
- आधार कार्ड
- जन्म दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
या व्यवसायासाठी मिळणार कर्ज
या योजनेअंतर्गत (Udyogini Scheme) कोणत्याही उद्योगासाठी कर्ज मिळू शकते. त्यात बेकरी, सौंदर्य प्रसाधन केंद्र, दुकान, साडी, अगरबत्ती उत्पादन, रास्त भाव दुकान, पिठाची गिरणी, स्टेशनरी स्टोअर आदी व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उद्योगिनी (Udyogini Scheme) योजना लघुव्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक, स्वयंरोजगार, व्यावसायिक, व्यापारासाठी अधिकाधिक 3 लाखांपर्यंतचे कर्ज पुरविले जाते.
अर्ज प्रक्रिया
व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेला भेट देऊ शकतो. कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात किंवा थेट पुरवठादाराच्या खात्यात यंत्रसामग्री, उपकरणे किंवा इतर कोणत्याही भांडवली खर्चासाठी वितरित केली जाते. सारस्वत बँक, बजाज फायनान्स सारख्या खाजगी वित्तीय संस्था देखील उद्योगिनीसाठी कर्ज देतात.