हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात आपण पंतप्रधान उज्वला योजनेसंदर्भात माहिती घेणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईन देखील अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळते. योजनेची सुरुवात २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेकरिता २०२१ या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. सरकारी योजनेच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांना गॅस कनेक्शन देण्यात येईल. योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना प्रत्येक प्रकारे मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने बीपीएल कुटुंबातील असणे अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2021 ची पात्रता खालीलप्रमाणे
–सर्वप्रथम, अर्जदाराचे नाव 2011 च्या जनगणनेच्या यादीत असणे अनिवार्य आहे.
–फक्त महिला अर्ज करू शकतात.
–वयानुसार, अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
–अर्ज करण्यासाठी, अर्जदार बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
–योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.
–सर्वात महत्वाचे म्हणजे, स्त्री भारताची रहिवासी असणे आवश्यक आहे.
उज्ज्वला योजनेसाठी कागदपत्रे
–नगरपालिका अध्यक्ष शहरी क्षेत्र BPL प्रमाणपत्र किंवा
–पंचायत प्रधान ग्रामीण क्षेत्र बीपीएल प्रमाणपत्र
–आधार कार्ड / मतदार कार्ड
–विहित प्रतीमध्ये 14 गुणांची घोषणा (अर्जदाराची स्वाक्षरी केलेले )
–बीपीएल रेशन कार्ड
–कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक
–पासपोर्ट आकार फोटो
–जन धन बँक खात्याची माहिती
–निवास प्रमाणपत्र
–जात प्रमाणपत्र
उज्ज्वला योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन पोर्टल pmuy.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करा.
— तिथे application for new ujawala 2.0 Connection वर क्लिक करा.
— या पेजवर तुम्हाला तीन ऑप्शन्स मिळतील. इंडियन भारत पेट्रोलियम आणि एचपी.
— आपल्या सुविधा नुसार पर्याय निवडा.
– त्यानंतर आपली माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
— याशिवाय तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून जवळच्या गॅस एजन्सी डीलर ला देखील देऊ शकता.
— डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एल पी जी गॅस कनेक्शन सरकारकडून दिले जाईल.