Weather Update : राज्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस तर, ‘या’ तारखेला उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दोन महिने उलटून गेले तरीही अवकाळी पाऊस ब्रेक घ्यायचं नाव घेत नाही. आज (ता.३) मे या दिवशी राज्यातील विदर्भ, मराठवाडा येथील काही भागात तुरळक अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Dept) लावला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात उन्हाळी पीक लावण्याकडेही कानाडोळा केला आहे.

येत्या ५ ते ७ मे पर्यंत नांदेड, लातूर, बीड, परभणी तसेच सोलापूर, सांगली, अक्कलकोट, सातारा, कोकणभाग, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. याउलट ९ ते १६ मे पर्यंत पुन्हा एकदा कडक ऊन पडणार आहे. यामुळे काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांनी अताच काढून घ्यावेत. जेणेकरून या सतत बदलत्या हवामानाचा परिणाम हा शेतीवर होताना दिसतो.

आपल्या गावात किती दिवस पडणार अवकाळी पाऊस :

शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यात अवकाळी पाऊस धुमशान मचावत आहे. हवामानातील बदलामुळे अवकाळी पाऊस हा काही वेळा आपल्या तालुक्यात, गावात कधी पडेल हे सांगता येत नाही. मात्र आता ही माहिती एका क्लिकवर माहिती मिळू शकते. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करून इंस्टॉल करा. या ॲपद्वारे आपल्याला हवामान खाते हा पर्याय निवडावा लागतो. तो पर्याय निवडून आपल्याला आपल्या गावचे वातावरण काय आहे? किती आहे? याचा सर्व अंदाज मिळवता येऊ शकतो. तसेच या ॲपच्या माध्यमातून जमीन मोजणी, हवामान अंदाज, सरकारी योजना, पशुपालन व्यवसाय, सातबारा याबाबत माहिती एकही रुपये खर्च न करता मिळू शकते.

या भागात अवकाळी पावसामुळे येलो अलर्ट जारी :

मध्य महाराष्ट्र, : नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर.

मराठवाडा : परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. या भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

error: Content is protected !!