हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या ढगाळ वातावरणात भाजीपाला पिकावर (Vegetable Pest and Disease Management) वेगवेगळ्या रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वेळीच या रोग आणि किडीचे व्यवस्थापन केले नाही तर नुकसान होऊ शकते. जाणून घेऊ या आठवड्यात भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन.
भाजीपाला पिकाचे व्यवस्थापन (Vegetable Pest and Disease Management)
- वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर भुरीचा (Powdery Mildew) प्रादुर्भाव होऊन उत्पादन आणि गुणवत्तेत घट होऊ शकते. भुरी रोगावर प्रतिबंधात्मक उपाय हेच नियंत्रणाची सर्वात योग्य पद्धती आहे, कारण एकदा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करणे काठी असते, यासाठी वेलींचे सतत निरीक्षण करावे.
- भुरी रोग प्रतिकारक वाणांची लागवड करावी.
- नत्र खताच्या अति वापरामुळे भुरी रोगाची तीव्रता वाढते, तर पोटॅश खतामुळे पिकाची अंतर्गत रोग प्रतिकारशक्ती वाढून रोगाची तीव्रता कमी होते. यासाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा समतोल प्रमाणात वापर करावा (Vegetable Pest and Disease Management).
- दाटीवाटीने वाढलेल्या पिकामध्ये रोग प्रसारासाठी अनुकूल सूक्ष्म हवामान बनते व रोगाची तीव्रता वाढते यासाठी पिकांच्या ओळीमध्ये हवा खेळती राहील अशाप्रकारे रोपांची संख्या ठेवावी.
- भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी हवामानानुसार 8 ते 10 दिवसांच्या अंतराने, मेप्टिलडीनोकॅप (37.5 EC) फवारणी करा. 0.7 मिली किंवा हेक्साकोनाझोल (5 ईसी) 1 मि.ली. किंवा डायफेनोकोनाझोल (25 ईसी) 0.5 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Vegetable Pest and Disease Management).
- भाजीपाला पिकांवरील फुलकिडी/थ्रीप्सचे (Vegetable Thrips) नियंत्रण करण्यासाठी फिप्रोनिल @ 15 मिली प्रति 10 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- रोपवाटिकेत वांगी, मिरची, टोमॅटो इ. भाजीपाला रोपांच्या जोमदार वाढीसाठी,पेरणीनंतर 15दिवसांनी प्रति वाफा 50 ग्रॅम युरिया खताची मात्रा द्यावी.
- भाजीपाला रोपे पुनर्लागवड करावयाच्या शेतात जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरू करावीत.
- उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी (Summer Onion Bed Preparation) गादी वाफे करून रोपे तयार करण्यासाठी बियाणे पेरणी करावी व उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारित जातींचा वापर करावा. बियाणे पेरणीपूर्वी अझोस्पिरिलम + पी.एस.बी.(PSB) या जीवाणू संवर्धनाचा वापर करावा.
- टोमॅटो पिकावरील करपा (Tomato Anthracnose) आणि रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी टेब्युकोनाझोल (29.5 EC) 1 मिली अधिक फिप्रोनील (5 SC) 1.5 मि.ली.च्या किंवा थायामेथोक्सम (25 डब्ल्यूजी) 0.4 ग्रॅम किंवा कार्बोसल्फॉन (25 ईसी) 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे बियाणे उगवल्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून दोन ते तीन वेळा फवारणी करावी (Vegetable Pest and Disease Management).