हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड (Vegetables Farming ) केली जाते. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळत असल्याने, अनेक शेतकऱ्यांचा ओढा नेहमी भाजीपाला लागवड करण्याकडे नेहमी असतो. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपेक्षा भाजीपाला पिकांमधून अधिकचा नफा देखील मिळतो. याशिवाय भाजीपाला पिकांना बाजारात वर्षभर मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? देशातील कोणत्या राज्यामध्ये भाजीपाल्याचे सर्वाधिक उत्पादन होते? तर आज आपण कोणत्या महत्वाच्या पाच राज्यांमध्ये देशातील सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन (Vegetables Farming) होते. हे जाणून घेणार आहोत.
‘या’ भाजीपाल्याची सर्वाधिक लागवड (Vegetables Farming In India)
राष्ट्रीय फळबाग महामंडळाच्या (आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांमध्ये प्रामुख्याने (Vegetables Farming) टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, काकडी, दुधी भोपळा, कोबी, पत्ता कोबी आणि तोंडलीसहित अनेक भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, शेपू, मेथी, कोथिंबीर अशा प्रमुख भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
उत्तरप्रदेशची उत्पादनात आघाडी
दरम्यान, महामंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील भाजीपाला उत्पादन हे उत्तरप्रदेश या राज्यामध्ये घेतले जाते. युपीमध्ये शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात भाजीपाला लागवड केली जात असून, देशातील एकूण भाजीपाला उत्पादनापैकी युपीमध्ये 16.01 टक्के इतके भाजीपाला उत्पादन होते. देशातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये 14.04 टक्के उत्पादन घेत, पश्चिम बंगाल राज्य भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर
देशातील घराघरामध्ये दररोज भाजीपाल्याचा मोठा वापर होतो. ज्यामुळे त्याला नेहमीच मोठी मागणी असते. देशातील सर्वाधिक भाजीपाला उत्पादन करणाऱ्या पाच राज्यांमध्ये तिसरा क्रमांक मध्यप्रदेश या राज्याचा असून, त्या ठिकाणी देशातील एकूण भाजीपाला उत्पादनापैकी 10.07 टक्के भाजीपाला उत्पादन होते. देशातील भाजीपाल्याच्या उत्पादनाच्या तुलनेत मजनू नेहमीच अधिक असते. भाजीपाला उत्पादनामध्ये 8.05 टक्के उत्पादनासह बिहार हे राज्य चौथ्या क्रमांकावर तर 07.06 टक्के भाजीपाला उत्पादनासह महाराष्ट्र हे राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण भाजीपाला उत्पादनापैकी ५५ टक्के भाजीपाला हे वरील पाच राज्यांमध्ये उत्पादित होतो.