लसणाचे भाव तेजीत; किलोला मिळतोय २०० रुपयांचा भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetables Price : मागच्या काही दिवसापासून भाजीपाल्याचे दर चांगलेच गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. मात्र भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यातील मुसळधार पावसाचा फटका मुंबईमध्ये भाजीपाल्यांच्या दरावर झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

मागच्या काही दिवसापासून टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. यानंतर आता मुंबईमधील काही ठिकाणी महत्त्वाच्या बाजारामध्ये देखील भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढल्याचे दिसत आहे. मुंबईत भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर चालवणं अवघड झाला आहे. त्यांचे आर्थिक बजेटचांगलेच कोलमडले आहे. लसणाच्या दराबाबत पाहिले तर लसणाचे देखील दर गगनाला भिडले आहेत. लसूण मागच्या आठवड्यात शंभर रुपये किलो दराने विकला जात होता. सध्या लसणाचा दर 180 ते 200 रुपये किलो झाला आहे याबाबत व्यापाऱ्यांनी देखील माहिती दिली आहे. त्याचबरोबर इथून पुढे लसणाचे दर वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

या कारणामुळे वाढले पालेभाज्यांचे दर (Vegetables Price)

मागच्या जुलै महिन्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाला आहे. परिणामी बाजारामध्ये कमी प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत बाजारात भाजीपाल्याची आवक वाढणार नाही तोपर्यंत भाजीपाल्याचे दर असेच तेजीत राहतील असे देखील व्यापाऱ्यांनी सांगितला आहे.

तुम्हाला जर भाजीपाल्याचे रोजचे दर जाणून घ्यायचे असतील तर प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi अस सर्च करा. हे सर्च केल्यानंतर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करा हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी बाजार भाव या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या भाजीपाल्याचा बाजारभाव पाहिजे तो भाजीपाला सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या भाजीपाल्याचा बाजारभाव पाहायला मिळेल, त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.

error: Content is protected !!