Vermi Compost Fertilizer : गांडूळ खत व रासायनिक खतात काय फरक असतो; वाचा सविस्तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी सध्या अनेक प्रकारची खते (Vermi Compost Fertilizer) उपलब्ध आहेत. यामध्ये रासायनिक खते आणि शेतकऱ्यांनी बनवलेले वर्मी कंपोस्ट खत यांचा समावेश आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीच्या उत्पादकतेत घट होते. याशिवाय मातीचे आरोग्य देखील बिघडते. अशा वेळी शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट खत वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र वर्मी कंपोस्ट खत म्हणजे काय? वर्मी कंपोस्ट खत आणि रासायनिक खतांमध्ये नेमका काय फरक असतो? वर्मी कंपोस्ट खताचे (Vermi Compost Fertilizer) फायदे काय आहेत? याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

वर्मी कंपोस्ट खत म्हणजे काय? (Vermi Compost Fertilizer For Farmers)

वर्मी कंपोस्ट हे सेंद्रिय खत आहे. त्याला गांडूळ खत असेही म्हणतात. हे खत गांडुळे आणि शेणाच्या साहाय्याने तयार केले जाते. गांढूळ खत तयार करण्यासाठी साधारणपणे दीड महिन्यांचा कालावधी लागतो. खतापासून जमिनीचे किंवा वातावरणाचे कोणतेही प्रदूषण होत नाही. या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश पुरेशा प्रमाणात आढळतात. जे पिकांच्या वाढीसाठी मदत करतात आणि मातीचा पोत टिकवून ठेवतात.

काय आहे दोघांमध्ये फरक?

सध्या गांडूळ खत अर्थात सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. मात्र रासायनिक खते आणि गांढूळ यात नेमका काय फरक असतो. तर गांडूळ खत हे रासायनिक खतांच्या तुलनेत खूपच स्वस्त असते. याशिवाय शेतकरी घराच्या घरी गांढूळ खताची निर्मिती करू शकतात. याउलट रासायनिक खते ही महागडी असून, ती घरी बनवली जाऊ शकत नाही. गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. तर रासायनिक खतांचा सतत मारा केल्याने जमिनीची उत्पादन क्षमता घटते. गांडूळ खतामुळे जल, मृदा असे कोणतेही प्रदूषण होत नाही. याउलट रासायनिक खतांमुळे जल, जमीन दोघांचेही प्रदूषण होते.

बाजारात अधिक मागणी

गांडूळ खताचा वापर (Vermi Compost Fertilizer) केल्यास पिकांना कीटकनाशक आणि औषधांचा वापर कमी करावा लागतो. याउलट रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशके आणि औषधे आधी प्रमाणात वापरावी लागतात. तर गांढूळ खताच्या वापरामुळे पिकांची गुणवत्ता ही आणि आहार शुद्ध मानला जातो. याउलट रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादित पिके ही केमिकल युक्त मानली जातात. ज्यामुळे जैविक किंवा गांढूळ खताच्या वापरातून उत्पादन घेतलेल्या पिकांना बाजारात खूप मागणी असते.

गांढूळ खताचे फायदे

  • शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते.
  • रासायनिक खतांवरील खर्च कमी झाल्याने, तसेच जैविक उत्पादनांना अधिक मागणी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते.
  • गांढूळ खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
  • गांढूळ खतामुळे (Vermi Compost Fertilizer) जमिनीत गारवा कायम राहतो. त्यामुळे पिकांना पाणी देण्याची गरज रसायनुईक खतांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
  • बाजारात रासायनिक खतांचा नेहमी तुटवडा असतो. मात्र, गांढूळ खत तयार करण्याचे योग्य नियोजन केल्यास, शेतकऱ्यांकडे नेहमी खत उपलब्ध राहते.

कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती

  1. जैव खतांचा प्रयोगातून : ॲजेक्टोबॅक्टर, अझोस्पिस्लिम, फॉस्फरस विरघळणारे जैव-खते, पोटॅशियम विरघळणारे जैव-खते, वनस्पती वाढीचे संप्रेरक इत्यादींचा प्रति टन तयार गांडूळ खतासोबत प्रत्येक 1 किंवा 2 किलो वापर कंपोस्ट खत तयार करता येते. याशिवाय त्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पालाशची उपलब्धताही वाढते.
  2. बायो-कंट्रोलरच्या माध्यमातून निर्मिती : एक टन तयार गांडूळ खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश इत्यादी 1 किंवा 2 किलो प्रमाणात मिसळून कंपोस्ट खत तयार केले जाते. याचा पिकांच्या फायदा वाढीस होतो. याशिवाय वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
  3. रॉक फॉस्फेटचा प्रयोगातून : एक टन तयार गांढूळ खतामध्ये 20 रॉक फॉस्फेट मिसळल्याने कंपोस्ट खतामध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढते.
  4. खनिज घटकांच्या वापारातून : एक टन तयार गांढूळ खतामध्ये 20 खनिज तत्वे मिसळल्याने पिकांना केवळ पोषक तत्वांचा पुरवठा होत नाही. तर वनस्पतींचे हार्मोन्स वाढण्यासही मदत होते.
error: Content is protected !!