हॅलो कृषी ऑनलाईन: घरांमध्ये भिंतीवर पाली (Wall Gecko Farming) दिसल्या की आपण नक्कीच घाबरतो. बहुतेक जणांना पाल हा प्राणी किळसवाणा वाटतो. आणि ते पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाय करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, असे काही देश आहेत जिथे पाली पाळल्या जातात (Wall Gecko Farming). येथे काही लोक रात्रीच्या वेळी हातात हेडलॅम्प आणि जाड काठ्या घेऊन घराबाहेर पडतात आणि पाली पकडतात. एवढेच नाही तर यातून मिळणाऱ्या कमाईतून हे लोक आपले घर चालवतात. नक्कीच तुमच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली असणार, हे कसे शक्य आहे म्हणून?
पण होय तुम्ही अगदी बरोबर वाचलेलं आहात, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये लोक पाली पालनातून (Wall Gecko Farming) लाखोंची कमाई करत आहेत. पालीच्या टोके गेको (Gecko Farming )सारख्या प्रजातींमध्ये औषधी गुणधर्म (Medicinal Importance Of Gecko Farming) आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किमतीत विकल्या जातात. त्यामुळे या व्यवसायाला चांगलेच महत्व प्राप्त होत आहे.
आजच्या लेखात जाणून घेऊ या चिपकळी म्हणजेच पालीची शेती कशी केली जाते आणि त्यातून किती पैसे मिळतात?
या देशांमध्ये केली जाते पालीची शेती (Wall Gecko Farming)
विशेषतः थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्ये पाली मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. टोके गेको नावाच्या पालीच्या बहुतेक प्रजाती पाळल्या जातात. या प्रजातीच्या पाली त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. काही लोक जंगलात, गावांमध्ये, जुन्या घरांमध्ये जाऊन त्यांना पकडतात.
पाली कशाप्रकारे पकडतात?
पाली पकडण्यासाठी येथील लोकांकडे सुमारे 2 मीटर लांबीची काठी असते, ज्याच्या टोकाला गोंद लावलेला असतो. हे लोक रात्रीच्या वेळी ही काठी वापरून पाली पकडतात. जेव्हा पाली लाकडाच्या टोकाला चिकटतात तेव्हा काळजीपूर्वक काढून त्यांना बॉक्समध्ये ठेवतात. एका रात्रीत सुमारे 400 ते 450 पाली पकडल्या जातात. याशिवाय पावसाळ्यात पालीची संख्या वाढते कारण हे प्राणी डासांची आणि किड्यांची शिकार करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे पाली पकडणाऱ्यांचे काम आणखी सोपे होते. पकडलेल्या पालींना सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते आणि त्यांच्यासाठी खास वातावरण तयार केले जाते. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार दिला जातो आणि काळजी घेतली जाते (Wall Gecko Farming).
एका रात्रीत 5 हजार रुपये कमाई
पाली पालन (Wall Gecko Farming) हा व्यवसाय या लोकांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत बनला आहे आणि याद्वारे ते आपले जीवन सुधारत आहेत. स्थानिक पातळीवर लोक एका रात्रीत पाली पकडून सुमारे 2000 ते 5000 रुपये कमावतात. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दुर्मिळ जातीच्या पाली किंवा सरडे विकून (Lizard Farming) 50 हजार ते एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई होऊ शकते. टोके गेको सारख्या दुर्मिळ प्रजातीच्या पालीची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किमतीत विक्री केली जाते. या प्रजातीची किंमत हजारो ते लाखो रुपयांपर्यंत असू शकते.
पालींचा वापर (Gecko Uses)
पारंपारिक औषध आणि इतर उद्योगांमध्ये पाली अनेक महत्त्वाच्या उपयोगांसाठी वापरले जातात. याशिवाय चीनच्या वैद्यकीय उद्योगात पालींना विशेष स्थान आहे. येथे ते औषधांमध्ये वापरले जातात (Gecko Medicine), जे दमा, संधिवात आणि त्वचा रोगांच्या उपचारांमध्ये उपयुक्त मानले जातात. त्यांची त्वचा आणि इतर अवयव औषधे तयार करण्यासाठी वापरले जातात, जे विविध आरोग्य समस्यांवर उपचार करतात. त्याच वेळी, काही देशांमध्ये पाली किंवा सरडे अन्न म्हणून देखील वापरले जातात. हे प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा एक चांगला स्त्रोत मानला जातो आणि त्यांच्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात (Wall Gecko Farming).