Weather Prediction: ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रात कसे असणार हवामान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान खात्याने (Weather Prediction) आज तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सौम्य थंडी पडली असून डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. मात्र अजूनही काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे (Weather Prediction).

कसे असणार महाराष्ट्रातील हवामान (Weather Update Maharashtra)

काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आजपासून राज्यात परतीच्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. आज राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जिल्हा आणि घाट भाग, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, या जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात काही ठिकाणी येलो अलर्ट असून ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे (Weather Prediction).  

देशातील इतर राज्यातील हाल (Weather Prediction)

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर दिल्लीत हवामान (Delhi Weather Update) स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 19 अंश राहील. दिवाळीपूर्वीच राजधानी दिल्लीत प्रदूषणामुळे हलके धुके जाणवत आहे, त्यामुळे हवेची गुणवत्ताही खालावू लागली आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रीवादळानंतर बिहारच्या अनेक भागात पाऊस आणि ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान बिहार (Bihar Weather) राज्यातील विविध भागात हलके ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशच्या हवामानात (Uttar Pradesh Weather) रात्री बदल होताना दिसत आहेत. पूर्व भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने आज पूर्व उत्तर प्रदेशातील विविध भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आज पश्चिम उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहणार आहे (Weather Prediction).

error: Content is protected !!