Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात उष्णतेची लाट आली असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशात आता महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वाहणारे वारे येऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

11 मार्च रोजी हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी वारे आणि माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे 13-15 मार्च दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला असून शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

असा मिळवा पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हवामानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे. कारण आता एकही रुपया खर्च न करता तुम्हाला तुमच्या गावातील पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज मोबाईलवरून मिळत आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. यांनतर हॅलो कृषीचे मोबाईल अँप Install करून मो. ना. टाकून रजिस्ट्रेशन केल्यांनतर तुम्हाला होम स्क्रीनवरच तुमच्या गावाचे नाव येते. तसेच हवामान अंदाज या विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील पुढील तीन दिवसांचा अचूक हवामान अंदाज जाणून घेतो येतो.

IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार 13 मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही यावेळी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबई शहर व उपनगरात येत्या 24-48 तासात काही तुऱळक ठिकाणी उष्णतेची लाट ये़ण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सामान्य मानाने काय काळजी घ्यावी?
🔺काळजी घ्या,प्रखर उन्हात🌞 शक्यतो बाहेर पडू नका.
🔺सुती कपडे, 🧢टोपी, छत्रीचा ☂😎 वापर करा.
🔺तेलकट-जड खादय पदार्थ टाळा
🔺पाणी,🥛🍊सऱबत, नारळ पाणी इ प्या
🔺Hello Krushi अँपवर हवामानाचे अपडेट पहा.

महाराष्ट्र किमान तापमान काही ठिकाणी (11 मार्च)
जळगाव 15.0°C
सातारा 17.5
नाशिक 16.2
छ संभाजीनगर 15.2
पुणे 14.7
बारामती 15.7
महाबळेश्वर 16.8
जालना 18.8
मुंबई 23.0

error: Content is protected !!