हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील ३ ते ४ तासात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बाहेर जाताना काळजी घ्यावी.
तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आज दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 16 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 14 ते 20 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून “Hello Krushi” अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.