Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता तर काही भागात तापमानात प्रचंड वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : राज्यातील वातावरण रोज मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही भागात अवकाळी पाऊस होतोय तर काही भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. हवामानातील बदलाचा परिणाम शेतपिकांवर होऊन यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम असून कोकणभाग, मध्य महाराष्ट्रात आज ता.१३ मेपासून ते १६ मेपर्यंत अवकाळी पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यातील काही भागात येत्या काही दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असून उकाड्यात वाढ होणार आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तापमानात वाढ होणार असून वातावरण उष्ण आणि दमट पहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके लवकरात लवकर काढून घ्यावीत. अन्यथा पुन्हा एकदा १७ तारखेपासून अवकाळी पावसाची शक्यता आहे.

तुमच्या गावातील वाचून हवामान अंदाज कुठे चेक कराल?

शेतकरी मित्रांनो, सध्याचं राज्यातील वातावरण पाहता, वातावरणात चढ – उतार पहायला मिळत आहे. म्हणजेच कधी ऊन पडत आहे, तर कधी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यापार्श्वभूमीवर आता आपण आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन नुकसान टाळू शकतो. यासाठी तुम्हाला Hello krushi हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi या ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. यात हवामान अंदाज या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आपल्या गावात, तालुक्यात किती ऊन किंवा पाऊस पडेल हे जाणून घेणं आता सोपं झालं आहे. याचसह जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी- विक्री या बाबी एकही रुपये खर्च न करता जाणून घेता येणार आहे.

उष्ण लाटेचा इशारा

विदर्भ : वर्धा, अकोला या भागात उन्हाचा चटका कायम राहणार असून उकड्यातही वाढ होणार आहे. यामुळे या भागात उष्णता येत्या १६ मेपर्यंत कायम पहायला मिळणार आहे.

error: Content is protected !!