Saturday, February 4, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : कमी दाबाचे क्षेत्र होणार तीव्र; राज्यात आजही पावसाची शक्यता

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
December 14, 2022
in हवामान
rain
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन थंडीच्या दिवसात राज्यात सध्या बहुतांशी भागात सध्या ढगाळ वातावरण (Weather Update) आणि तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावतो आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी प्रणालीच्या पाठोपाठ आता अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आज दिनांक १४ डिसेम्बर रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान स्थिती

केरळ आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.१३) कमी दाब क्षेत्राची निर्मिती (Weather Update) झाली आहे. ही प्रणाली आज आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ती भारताच्या किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटाजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

आज ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

दरम्यान मागच्या २४ तासात राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ (Weather Update) झाली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होते. वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. आज (ता. १४) मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण निवळताच उद्यापासून (ता.१५) किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ?(Weather Update)

मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.६ (२०.१), जळगाव ३०.६ (२१.५), धुळे ३१.० (१८.५), कोल्हापूर २७.७ (२२.०), महाबळेश्वर २२.०(१६.२), नाशिक २८.८ (१९.९), निफाड ३०.२ (१०.५), सांगली २७.७ (२१.८), सातारा २८.९(२२.०), सोलापूर ३०.२ (२२.२), सांताक्रूझ ३४.२(२५.४), डहाणू ३४.२ (२३.२), रत्नागिरी ३२.० (२५.३), औरंगाबाद २८.२ (१७.७), नांदेड २९.० (२१.६), उस्मानाबाद – (१८.४), परभणी २९.० (२१.१), अकोला ३०.८ (२२.३), अमरावती २९.४ (२०.४), बुलडाणा २९.० (२०.०), ब्रह्मपुरी ३४.२ (२१.६), चंद्रपूर ३०.० (१८.४), गडचिरोली ३०.०(१८.४), गोंदिया ३०.५(२०.०), नागपूर ३०.६ (२१.४), वर्धा ३३.०(२२.४), यवतमाळ – (१८.०).

Tags: MaharashtraRainweather updateWinter
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group