Weather Update : बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते ओडिशा आणि उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पुढील ४,५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
वाऱ्याच्या वरील स्तरातील चक्रीय स्थिती सध्या बंगाल उपसागराच्या मध्य व लगतच्या उत्तर भागावर आहे. त्यामुळे पुढील २४ तासात बंगालच्या उपसागराच्या वायव्य व लगच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुढे त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील असे हवामान विभागाने सांगितले आहे.
तर दुष्काळ जाहीर करावा लागेल: मंत्री मुंडे
पावसाचा असाच खंड राहिला तर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलीय. सलग २१ दिवसांपासून पावसाचा खंड पडलाय. अशा परिस्थितीत सोयाबीनच काय तर कोणतंही पीक येऊ शकत नाही. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास दुष्काळ जाहीर करावा लागेल असं मुंडेंनी नमूद केलंय.