Weather Update : महाराष्ट्रासाठी ‘हे’ 3 दिवस महत्वाचे! वादळी वाऱ्यासह पूर्व मान्सून होणार; हवामान विभागाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : राज्यात दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस पाठ सोडत नव्हता. तर आता काही दिवस झाले असतील राज्यात उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी ऊन असा वातावरणाचा लपंडाव सुरू आहे. अशातच आज (ता.१५) रोजी कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

या उन्हामुळे पिकांचे नुकसान होताना दिसते. तर परभणी, अमरावती, वर्धा येथे तापमान ४४ अशांच्या पुढे गेले आहे. तसेच धुळे, सोलापूर, नांदेड, यवतमाळमध्ये पारा ४३ अंशांच्या वर आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. अशातच आता पुन्हा एकदा २१,२२,२३ मे या दिवसात राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पूर्व मान्सून होणार असल्याची शक्यता आहे.

आपल्या गावात ऊन असणार की पाऊस?

राज्यात कधी अवकाळी पाऊस तर कधी उन्हाचा चटका जाणवत असतो. यामुळे द्रारावज वातावरणात बदल होतो. हा बदल कधी कोणत्या गावात, तालुक्यात होईल हे सांगता येत नाही. मात्र आता ते जाणून घेणं सोयीचं झालं आहे. पण त्यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करावं लागेल. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करून इंस्टॉल करावं लागेल. या ॲपमध्ये प्रवेश केल्यावर हवामान अंदाज या पर्यायावर क्लिक करून दररोजचा आपल्या गावातील, तालुक्यातील हवामानाचा अंदाज जाणून घेता येईल. तसेच जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी – विक्री या बाबी आता एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकतात.

पूर्व मान्सून होणार (Weather Update) –

पावसाच्या ऋतुपूर्वी काही दिवस उन्हाळ्यातच पाऊस होतो. त्याला पूर्व मान्सून पाऊस म्हणता येईल. हा पाऊस दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर उन्हाळ्यात पडत असतो. येत्या २१,२२,२३ या दिवशी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस होणार आहे.

error: Content is protected !!