Weather Update : महाराष्ट्रात अवकाळीचे संकट कायम! आज ‘या’ शहरांना येलो अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : उन्हाळा ऋतू सुरू असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. अशातच अवकाळी पाऊस पाचवीला पुजलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागात अवकाळी पावसाने अधिकाधिक हजेरी लावल्याने समजते. आज देखील या दोन भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) सांगितली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

विदर्भाच्या चंद्रपुरात काल ( ता.१५) या दिवशी अधिकाधिक तापमान ४८ अंश सेल्सिअस होते. या भागातले तापमान हे दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे होते. इतर भागात ३६ ते ४० तापमान असून उन्हाचा तडाखा कायम आहे. तसेच आपल्याला आपल्या गावातील हवामानाबाबत माहिती मिळवायची असल्यास आपण Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा.

आपल्या गावातील हवामानाची अचूक माहिती कुठे मिळेल?

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi असे सर्च करा. त्यानंतर हिरव्या रंगाचे ॲप इंस्टॉल करा. त्या ॲपमध्ये आपल्या गावात आज किती पाऊस पडेल. तसेच आजचे नेमके हवामान काय आहे? कसे आहे? याबाबत या ॲपद्वारे माहिती मिळू शकते. यासह जमीन मोजणी, नकाशा मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा उतारा हि सर्व माहिती या ॲपद्वारे मिळू शकते.

शुक्रवारी (ता. १४) रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता.१६) या दिवशी मराठवाडा, विदर्भात काही भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खालील दिलेल्या विभागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खालील विभागातील शहरात येलो अलर्ट जारी :

मराठवाडा : धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलढाणा, वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर. या विभागात अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

error: Content is protected !!