राज्यात थंडी वाढणार; चुरु येथे हंगामातील निचांकी 1.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दिवसा उन्हाचा चटका वाढत असून तापमानातील चढ -उतार कायम आहे. राज्यात आज पासून किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत निचांकी १.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मागच्या २४ तासात राजस्थानामधील चूरू येथे करण्यात आली

हवामान स्थिती

पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन)किनाऱ्यापासून दूर जात आहे. आज (ता.१७) सायंकाळपर्यंत या प्रणालीची तीव्रता ओसरणार आहे. यातच आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

आजपासून (ता. १७) राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पारा घसरण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. १६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते. सोलापूरात देशातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कुठे किती हवामान ?

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१६.५), जळगाव – (१९.०), धुळे ३१.० (१५.८), कोल्हापूर ३०.५ (१९.०), महाबळेश्वर २७.३(१५.९), नाशिक २८.८ (१७.९), निफाड २९.८ (१६.०), सांगली ३२.३ (१८.३), सातारा ३१.३(१७.४), सोलापूर ३५.० (१९.५), सांताक्रूझ ३४.९(२३.०), डहाणू ३१.६ (२२.६), रत्नागिरी ३४.० (२२.०), औरंगाबाद २९.४ (१६.०), नांदेड – (२०.४), परभणी ३१.४ (१९.२), अकोला ३२.३ (२१.०), अमरावती ३२.२ (१९.५), बुलढाणा २८.४ (१८.६), ब्रह्मपूरी ३४.० (१९.४), चंद्रपूर ३०.८ (१९.६), गडचिरोली ३१.२(१६.८), गोंदिया ३१.०(१९.२), नागपूर ३०.८ (१८.९), वर्धा ३१.२(१९.८), यवतमाळ ३२.७ (१९.०).

error: Content is protected !!