Weather Update : अवकाळी पाऊस थांबणार का? कोणत्या जिल्ह्यात कसे राहील हवामान ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन, त्यानंतर पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव, लातूर, नांदेड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मराठवाडयात दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

error: Content is protected !!