Weather Update : राज्यात अवकाळी पाऊस पाठ सोडेना; या जिल्ह्यात पुन्हा येलो अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : गेली दहा दिवस अवकाळी पाऊस, गारपीट राज्यात थैमान घालत आहे. आज (ता.१९) बुधवार या दिवशी महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची स्थिती स्थिर पहायला मिळणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ब्रह्मपुरीत ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची, तर अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव, अमरावती येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. चंद्रपूरमध्ये ४३.२ सर्वाधिक तापमान आहे. तसेच उर्वरित राज्यातील भागात कमाल ३४ ते २४ अंशापर्यांत तापमान आहे. यामुळे आज राज्यात उन्हासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळवा

शेतकरी मित्रांनो आपण अजूनही हॅलो कृषी हे मोबाईल ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi या ॲपचे नाव टाका. या ॲपद्वारे आपल्या गावात किती पाऊस पडेल याची माहिती मिळू शकते. तसेच या ॲपद्वारे जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान, नकाशा मोजणी, सातबारा उतारा ही सर्व माहिती या ॲपद्वारे मिळेल.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत ९०० मी. उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भभागात अवकाळी पाऊस पाठ सोडणार नाही. तसेच आजच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास हवामान खात्याने राज्यातील काही विभागात येलो अलर्ट जारी करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले.

  • राज्यातील या विभागात येलो अलर्ट जारी
  • मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर.
  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड.
  • विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
  • या विभागात अवकाळी पावसाने येलो अलर्ट जारी केला असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
error: Content is protected !!