Weather Update : राज्यात पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; हवामान विभागाने दिला अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. यामुळे ठिकठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून याचा फटका शेतकऱ्याच्या अर्थकारणावर झाला आहे. अशातच आज (ता.२) आणि उद्या (ता.३) या दोन दिवसात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Department) वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज ढगाळ वातावरण आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ५ ते ७ मे या दिवसातही उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसात शेतकऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अशातच ९ ते १६ मेपर्यंत राज्यात उन्हाची तिव्रता वाढणार आहे. वाढणाऱ्या उन्हाचा परिणाम पिकांवर होईल यासाठी काढणीला आलेले पीक काढून घ्या.

आपल्या गावात पुढील किती दिवस पाऊस होणार हे जाणून घेण्यासाठी हे करा

शेतकरी मित्रांनो, दररोजच्या बदलत्या वातावरणामुळे शेतपिकांवर परिणाम होतो. सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात येत्या काही दिवसात कोणत्या भागात अवकाळी पाऊस असेल हे जाणून घेणे आता सोपं झालं आहे. यासाठी Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. प्ले स्टोअरवर जाऊन ॲपचे नाव सर्च करा आणि इंस्टॉल करा. तसेच या ॲपद्वारे हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन याची माहिती एका क्लिकवर मिळू शकते.

error: Content is protected !!